Siddharth Chandekar ने लावलं आईचं दुसरं लग्न; Happy Second Innings आई! म्हणत दिल्या शुभेच्छा

Siddharth Chandekar ने लावलं आईचं दुसरं लग्न; Happy Second Innings आई! म्हणत दिल्या शुभेच्छा

Siddharth Chandekar Mother Marriage : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) याने आपल्या आईचं दुसरं लग्न (Mother Marriage ) लावलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर (Sima Chandekar ) या आता दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाल्या आहेत. याबद्दल सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. आहे. त्याने यावेळी आपल्या आईला Happy Second Innings आई! असं म्हणत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Box Office Collection:’जेलर’ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; कोण हिट कोण फ्लॉप..? जाणून घ्या…

काय म्हणाला सिद्धार्थ चांदेकर?
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) याने आपल्या आईच्या लग्नाची माहिती देणाऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे. Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा. तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं. तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं. हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई!’ असं म्हणत आईला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘शेतकरी हिताच्या निर्णयाचे धाडस त्यावेळच्या मंत्र्यांनीही दाखवलं नाही’; विखे पाटलांनीही काढला इतिहास

दरम्यान अशा अनेक घटना घडतात. ज्यामध्ये पतीच्या किंवा पत्नीच्या अकाली निधनाने पती किंवा पत्नी हे एकटे पडतात. मात्र जीवनाच्या अशा टप्प्यावर ते असतात जेथे ते आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये शिक्षणामध्ये अत्यंत व्यस्त असतात. तेव्हा त्यांना आपल्या या एकटेणाबद्दल फारसे जाणवत नाही. मात्र जेव्हा मुलं मोठे होतात. त्यांची ही लग्न होतात. ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात. तेव्हा मात्र आपला जोडीदार नसल्याने पती किंवा पत्नी हे एकटे पडतात. तेव्हा त्यांना आयुष्यात जोडीदार असण्याची अत्यंत आवश्यकता असते.

मात्र जीवनाच्या या टप्प्यावर कोणीही दुसरा जोडीदार निवडण्याच्या भानगडीतही पडत नाही. एकाकी आयुष्य जगत राहतात. त्याला सामाजिक विचारधारेचाही एक प्रभाव असतो. त्यामुळे लोक काय म्हणतील? या प्रश्नाला घाबरून आपल्या आयुष्य एकट आणि चिंतेत घालवत असतात. त्याचबरोबर आपले पाल्य आपल्या या निर्णयाला स्विकारतील का? हा ही प्रश्न असतो. मात्र काही पुढारलेल्या विचारांचे लोक त्यात हा दुसरा जोडीदार निवडण्याचा निर्णय घेतात. त्यांचं कुटुंब देखील त्यांना त्यांच्या निर्णयात पाठिंबा देत. त्याच एक ताज उदाहरण ठरला आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube