lack of sleep can damage relationships and mental health : रात्रीची चांगली झोप घेणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण झोप आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. घरी आणि ऑफिसमध्ये आपल्या उत्पादकतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शरीराला मिळालेली पुरेशी झोप आपल्याला दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रीत करायला आणि उत्साही ठेवायला मदत करते.
त्यांच्या डोक्यावर बंदूक पण खाजगीत विचारलं तर… शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटीलांचा टोला
पण जेव्हा तुम्हाला पुरेशी आणि गाढ झोप मिळत नाही. तेव्हा तुम्हाला अनेक मानसिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जसे की, छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येणे आणि जास्त चिडचिडे होणे. तुम्हाला अधिक मूड स्विंग्सचा अनुभव येऊ शकतो. एवढेच नाही तर झोपेचा अभाव तुमच्या नातेसंबंधांवरही परिणाम करू शकतो. म्हणून तुम्ही तुमची झोप आणि नातेसंबंधांमध्ये योग्य संतुलन राखण्याचा विचार केला पाहिजे.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; विरोधी पक्षनेते राहुल गांधीचा गंभीर आरोप
आरोग्यासाठी झोप का महत्त्वाची आहे?
झोप ही शरीरासाठी अन्न आणि पाण्याइतकीच महत्त्वाची आहे. झोपेच्या वेळी आपले शरीर स्वतःला बरे करत असते. एखाद्या व्यक्तीला किती प्रमाणात झोपेची आवश्यकता असते. हे त्या व्यक्तीच्या वयावर आणि आरोग्यावर अवलंबून असते. पण अमेरिकेच्या आरोग्य संस्था नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार कोणत्याही प्रौढ व्यक्तीने रात्री 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे.
Tata Capital IPO ‘या’ दिवशी येणार, गुंतवणूकदारांना होणार बंपर फायदा; जाणून घ्या सर्वकाही
वारंवार होणारी चिडचिड
झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड आणि मूड स्विंग्स वाढू शकतात. ज्यामुळे जोडीदाराशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता वाढते. जेव्हा पती-पत्नी दोघेही थकलेले असतात. तेव्हा संयम आणि सहनशीलतेची पातळी आपोआप कमी होते. त्यामुळे संघर्ष निर्माण होतात आणि त्याचा नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो.
बांग्लादेशमध्ये अहमदाबाद विमान अपघाताची पुनरावृत्ती; शाळेच्या इमारतीवर कोसळलं फायटर प्लेन, 16 मृत्यू
भावनिक बंधन कमी होणे
झोपेचा अभाव भावनिक बंधनांवर परिणाम करतो. त्यामुळे जोडीदारांना एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले राहणे कठीण होऊन जाते. झोपेचा अभाव तुमच्या नात्यातील समजुतींवर नकारात्मक परिणाम करतो.