Download App

महर्षी पतंजली ते जग्गी वासुदेव: जगात भारताचा डंका गाजविणारे महान योगगुरू

भारताने जगाला योगरुपी ठेवा दिला आहे. त्यामुळे जगभरातील लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाला आहे. शुक्रवारी जागतिक योग दिवस साजरा होत आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

International Yoga Day 2024: maharshi-patanjali-to-jaggi-vasudev: भारताने जगाला योगरुपी ठेवा दिला आहे. त्यामुळे जगभरातील लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाला आहे. याचे श्रेय भारतातील महान योग गुरुंना जात आहे. शुक्रवारी 21 जूनला जागतिक योग दिवस (Yoga Diwas) साजरा होत आहे. या निमित्त भारतातील योग गुरुंबाबत माहिती जाणून घेऊया…(maharshi patanjali to jaggi vasudev the great yoga gurus who stunned indias yoga in the-world)

भाजपचे भर्तृहरि महताब लोकसभेचे प्रोटेम स्पीकर, राष्ट्रपतींकडून नियुक्ती, काय असेल पॉवर?


महर्षी पतंजली-
महर्षी पतंजली यांना योगाचे जनक म्हटले जाते. त्यांनी योगाची १९५ सूत्रे मांडली, ज्यांना योग तत्त्वज्ञानाचे आधारस्तंभ मानले जाते.त्यांनी अष्टांग योगाचे महत्त्व समजावून सांगितले.

तिरुमलाई कृष्णमाचार्य:
तिरुमलाई कृष्णमाचार्य यांना आधुनिक युगातील योगाचे जनक म्हटले जाते. त्यांना आयुर्वेद आणि योगाचे ज्ञान होते. हठयोगाच्या अभ्यासाला पुन्हा प्रोत्साहन देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महर्षी महेश योगी – महर्षी महेश योगी यांनीही योगाला जगासमोर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अमेरिकेतून परदेश प्रवास सुरू केला आणि हॉलंड गाठले. त्यानंतर त्यांनी तेथेच आपले कायमचे वास्तव्य केले.

हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं; शरद पवारांचं एक विधान अन् दादांना धास्ती


बीकेएस अय्यंगार:
बीकेएस अय्यंगार यांचे पूर्ण नाव बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराज अय्यंगार होते. त्यांनी अय्यंगार योगाची स्थापना केली आणि नंतरती जगभर पसरवली. त्यांनी योग विद्या नावाच्या संस्थेची स्थापना केली.

जग्गी वासुदेव (सद्गुरु): जग्गी वासुदेव किंवा सद्गुरू हे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून ते संपूर्ण जगाला योग शिकवतात. सद्गुरूंची संस्था जगभरात योगाशी संबंधित कार्यक्रमही आयोजित करते.

स्वामी रामदेव बाबा
-रामदेव बाबा (Ramdev Baba) प्रामुख्याने योग आणि आयुर्वेद जगभरात लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांच्यासोबत पतंजली आयुर्वेद कंपनीची स्थापना केली.

या सर्व योगगुरूंबरोबरच भारतातील इतरही अनेक योगगुरू आहे. ज्यांनी योगाला देश-विदेशात नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये श्री योगेंद्र, स्वामीराम, आचार्य रजनीश, स्वामी सत्येंद्र सरस्वती, गुरु परमहंस योगानंद, स्वामी शिवानंद, योगाचार्य स्वामी कुवलयानंद, अशी त्यांची नावे आहेत.

follow us

वेब स्टोरीज