Download App

महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव आणि IDBI बॅंकेत मेगा भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

  • Written By: Last Updated:

MSC Bank SO Recruitment 2024: आज अनेकजण नोकरीच्या (Job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणं महाकठीण काम आहे. दरम्यान, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Cooperative Bank) रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. बॅंकेने स्पेसालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांसाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत.

निवडणुकीआधी अखिलेश यादवांना धक्का! ‘त्या’ प्रकरणात CBI ने बजावली नोटीस 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 11 मार्च 2024 पर्यंत वेळ आहे.या भरती मोहिमेद्वारे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या आयटी, ट्रेझरी आणि इंटरनॅशनल बँकिंग विभागात विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 25 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ऑफिसर ग्रेड II च्या 2 पदे, कनिष्ठ अधिकाऱ्याच्या 12 पदे, देशांतर्गत व्यापार अधिकारी श्रेणी II च्या 4 पदे, फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड II आणि मिड/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी प्रत्येकी 1 पद, फॉरेक्स/ज्युनियर ऑफिसरच्या 4 पदांचा समावेश आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा:

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील विशेष अधिकारी या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भात तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यासाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com ला भेट द्यावी. तसेच, सर्वसाधारणपणे उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 28 ते 35 दरम्यान इतकी आहे.

निवड प्रक्रिया :

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विशेषज्ञ अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. यासंबंधी अपडेट्स जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

IDBI बॅंकेत 500 पदांसाठी भरती
याशिवाय, IDBI बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरतीद्वारे 500 पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये 203 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 135 पदे इतर मागासवर्गीयांसाठी, 50 पदे EWS, 75 पदे अनुसूचित जाती आणि 37 पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाले आहेत.

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पीडब्ल्यूडीसाठी २०० अर्ज शुल्क रुपये ठेवण्यात आले आहे.

या भरतीसाठी, अर्जदाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे.

follow us