Paytm New Festive Offer gold coin to Users on each payment : येणाऱ्या सणासुदींच्या काळामध्ये विविध शॉपिंग आणि खरेदींवर ऑफर दिल्या जातात. त्यामध्ये आता ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म असलेलं पेटीएम देखईल मागे राहिलेले नाही. त्यांनी देखील सणासुदीच्या काळामध्ये युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. त्यानुसार आता पेटीएम त्यांच्या यूजर्सला प्रत्येक पेमेंटवर गोल्ड कॉइन रिवॉर्ड म्हणून देणार आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊ?
मोठी बातमी : अभिनेता विजय यांच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू
पेटीएमने त्यांच्या युजर्संना प्रत्येक पेमेंटवर गोल्ड कॉइन देण्याची ऑफर आणली आहे. त्यानुसार आता या गोल्ड कॉइंसला ग्राहक डिजिटल गोल्डमध्ये रूपांतर करू शकतात. प्रत्येक व्यवहारानंतर युजर्सना एक टक्का गोल्ड कॉइन मिळेल. शंभर गोल्ड कॉइनचे मूल्य एक रुपया एवढी असेल जे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करता येऊ शकेल.
‘आणखी 10 सेकंद थांबलो असतो तर… जरांगेंवर निशाणा साधत हाकेंनी सांगितला हल्ल्याचा थरार!
पेटीएम च्या प्रत्येक प्रकारच्या ट्रांजेक्शनवर ही ऑफर मिळेल. ज्यामध्ये किंवा कोडद्वारे मर्चंट पेमेंट, ऑनलाईन पेमेंट, मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल पेमेंट आणि ऑटोमेटेड पेमेंट यांचा समावेश असेल. त्याचबरोबर यूपीआय पेमेंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नेट बँकिंग यावर देखील ही ऑफर मिळणार आहे. त्याचबरोबर जे युजर्स क्रेडिट कार्ड किंवा रुपये क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय पेमेंट करतात. त्यांना या ऑफरचा डबल फायदा मिळणार आहे. म्हणजे त्यांना डबल कॉइंस मिळतील.
या ऑफरच्या माध्यमातून पेटीएम त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सोडून गेलेले युजर्स पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण 2024 पासून पेटीएमचे युजर्स त्यांना सोडून गेले होते. कारण पेटीएमवर बंदी आली होती. त्यामुळे 13 टक्क्यांहून सात टक्क्यांपर्यंत पेटीएमचा मार्केट शेअर घसरला होता. मात्र ऑगस्ट 2025 मध्ये पेटीएम ने 1.4 बिलियन यूपीआय ट्रांजक्शन रेकॉर्ड केले. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत एक बिलियनहून जास्त होते. त्याचबरोबर जून 2025 च्या तिमाही मध्ये कंपनीने 123 कोटींचा नफा कमावला. या पार्श्वभूमीवर आता पेटीएम कडून पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.