‘आणखी 10 सेकंद थांबलो असतो तर… जरांगेंवर निशाणा साधत हाकेंनी सांगितला हल्ल्याचा थरार!
Lakshman Hake यांच्या गाडीवर अहिल्यानगरजवळ हल्ला झाला. त्यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्याचा थरार हाके यांनी सभेमध्ये सांगितला आहे.

Lakshman Hake on attack on him at Ahilyanagar also criticize Manoj Jarange : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे महाएल्गार सभा होणार होती. त्यावेळी सभास्थळी पोहचत असताना त्यांच्या गाडीवर अहिल्यानगरजवळ हल्ला झाला. त्यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्याचा थरार हाके यांनी सभेमध्ये सांगितला आहे.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
अहिल्यानगरमध्ये येत असताना माझ्या गाडीवर हल्ला झाला. यावेळी माझ्या गाडीच्या पुढे पोलीसांची गाडी होती मागे देखील पोलीसांची गाडी होते. पोलिसांकडे बंदूक देखील होत्या. तरी देखील माझ्यावर हल्ला झाला. या हल्लेखोरांना डिपार्टमेंटची भीती राहिलेली नाही. या हल्ल्यानंतर मनोज जरांगे यांनी आम्ही हा हल्ला स्वतःच केला असल्याचा आरोप केला. त्यानंतर लगेचच हे हल्लेखोर ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे ते कोण होते? हे सर्वांनाच माहित आहे.
अखेर शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालयाला ठोकले ताळे; जिल्हाधिकारी अशियांनी घेतला चार्ज…
त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. ओबीसी बोलायला लागले तर आमच्यावर हल्ले होत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाचा तुम्ही संरक्षण केलं नाही. ते आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही मेळावे घेत आहोत. पण आतापर्यंत आमच्यावर नऊ हल्ले झाले आहेत. या हल्ल्यामध्ये सुदैवाने मी बचावलो. पण माझ्यासोबतच्या दोन मुलांना मुकामार लागला आहे. जर आम्ही आणखी 10 सेकंद जरी थांबलो असलो तरी ते बांबू आमच्या डोक्यात पडले असते.
संयुक्त राष्ट्र संघ महासभेत पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर अन् हिंदूत्वावर बोट, भारताचं सडेतोड उत्तर
तसेच विजयसिंह पंडित यांनी मागणी केली होती की, मला काम देऊ नका. मात्र हा त्यांना ठोकण्याची संधी द्या. त्यांच्याच लोकांनी आमच्यावर हल्ला केला. त्या आरोपींना अद्याप पाठक झाले नसताना माझ्या गाडीवर देखील हल्ला झाला आहे. आरोग्य नाटक केले आहे मात्र त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे की आम्हाला महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार आहे का? असं म्हणत हाकेंनी या हल्ल्याची थरारक घटना सांगितली.