मोठी बातमी : अभिनेता विजय यांच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू

31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

  • Written By: Published:
Vijay’s TVK rally stampede At least 31 people dead, 50 hospitalised

Thalapathy Vijay TVK rally stampede : तमिळनाडूतील करूर येथे तमिलागा वेत्री कझगमचे अध्यक्ष आणि अभिनेता विजय थलापथी (Vijay’s TVK)यांच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. तर 51 हून अधिक जणांचा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Vijay’s TVK rally stampede At least 31 people dead, 50 hospitalised)

या घटनेनंतर मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी आरोग्य मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर या दुर्घटनेनंतर सभास्थळावर विजयने आपलं भाषण थांबवत लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. ॲम्बुलन्ससाठी रस्ता मोकळा करण्याचे विनंती केली.

‘आणखी 10 सेकंद थांबलो असतो तर… जरांगेंवर निशाणा साधत हाकेंनी सांगितला हल्ल्याचा थरार!

यावर मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली. ते म्हणाले, करूJ या ठिकाणी घडलेली चेंगराचेंगरीची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. मी माजी मंत्री भी संथिल बालाजी त्याचबरोबर मंत्री सुब्रमण्यम आणि जिल्हा कलेक्टर यांना गर्दीत बेशुद्ध झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याच्या निर्देश दिले आहेत. या ठिकाणी सध्या युद्ध स्तरावर मदत कार्य सुरू आहे.

अखेर शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालयाला ठोकले ताळे; जिल्हाधिकारी अशियांनी घेतला चार्ज…

दरम्यान या भाषणामध्ये विजय थालापती यांनी दावा केला की, तामिळनाडूमध्ये येत्या सहा महिन्यांमध्ये सत्ता परिवर्तन आणि नवीन राजकीय चेहरा पाहायला मिळेल. 2026 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय थालापती यांनीही रॅली काढली होती.

follow us

संबंधित बातम्या