SIP vs Sukanya Samriddhi Yojana : म्युच्युअल फंड एसआयपी आणि सुकन्या समृद्धी योजना या (Sukanya Samriddhi Yojana) दोन्ही योजना चांगल्याच लोकप्रिय आहेत. पालकांना मुलांच्या भवितव्याची काळजी असतेच. यासाठीच मुलांच्या जन्मापासून पालक त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. आज गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. यात चांगला परतावा देखील मिळतो. आज आपण अशाच काही लोकप्रिय गुंतवणूक योजनांबाबत माहिती घेऊ या..
गुंतवणूक करताना तुम्ही एकरकमी करू शकता किंवा टप्प्याटप्प्याने देखील करू शकता. गुंतवणुकीतील काही रक्कम एसआयपीमध्ये (Mutual Fund SIP) आणि राहिलेली रक्कम सुकन्या समृद्धी योजनेत करू शकता. यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स राहील. पण जर तुम्हाला या दोन्ही योजनांतून एकाची निवड करायची असल्यास आम्ही तुम्हाला एक सोपं कॅल्क्युलेशन सांगणार आहोत.
या योजनेत तुम्ही फक्त 25 रुपये भरून गुंतवणूक करू शकता. या योजनेत मिळणारा परतावा अन्य योजनांच्या तुलनेत जास्त आहे. या योजनेत 8.2 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. या योजनेत तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतात. कारण ही योजना शेअर बाजाराशी (Share Market) संबंधित नाही. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या योजनेत खात्रीशीर परतावा मिळतो.
आधी होम लोन क्लिअर कराल की SIP गुंतवणूक करताल? फायदा कशात, जाणून घ्या, सोपं गणित..
जर एखाद्या व्यक्ती आपल्या मुलांसाठी दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक करत असेल. पंधरा वर्षानंतर 8 लाख 27 हजार 321 रुपये परतावा म्हणून मिळतील. याबरोबरच एकूण रक्कम 17 लाख 27 हजार 321 रुपये असेल. म्हणजेच पंधरा वर्षांत त्या व्यक्तीने एकूण नऊ लाख रुपये जमा केले.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठीचा (Mutual Fund) एसआयपी हा एक चांगला मार्ग आहे. या अंतर्गत गुंतवणूकदाराला 12 टक्के दराने परतावा मिळतो. हा अंदाजित परतावा आहे. कारण यात मिळणारा परतावा हा शेअर बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतो.
जर एखादा व्यक्ती एसआयपीमध्ये दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक करत असेल. तर त्याला पंधरा वर्षांत 12 टक्के दराने 14 लाख 79 हजार 657 रुपये परत मिळतील. याबरोबरच एकूण रक्कम 23 लाख 79 हजार 657 रुपये असेल. हा परतावा अंदाजित आहे.
आता दोन्ही योजना समजून घेतल्यानंतर कोणती योजना जास्त फायदेशीर आहे असा प्रश्न उरतो. तर याचं उत्तर व्यक्तीची आवड आणि उद्देशांवर अवलंबून आहे. कारण सुकन्या समृद्धी योजनत परताव्याची हमी आहे तर एसआयपी द्वारे तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. या दोन्ही योजनांचा तुलनात्मक अभ्यास करून जी योजना तुम्हाला फायदेशीर वाटेल त्यात गुंतवणूक करू शकता.
Health Insurance : इमर्जन्सीमध्ये कसा कराल इन्शुरन्स क्लेम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप..