World Picnic Day 2024 : दरवर्षी 18 जून रोजी जागतिक पिकनिक दिवस साजरा (World Picnic Day 2024) केला जातो. पिकनिक हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. सन 1800 मध्ये फ्रान्समधील क्रांतीनंतर अशा पद्धतीची आऊटडोअर सहलीचे चलन देशात वाढले होते. पिकिनिकचा अर्थ मित्र किंवा नातेवाईकांबरोबर निसर्गाच्या सानिध्यात भोजन असा घेतला जातो. यानंतर एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधील पिकनिक चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता हीच पिकनिक जगभरात लोकप्रिय झाली आहे.
इतकेच नाही तर सन 2009 मध्ये जगातील सर्वात मोठ्या पिकनिक रेकॉर्डची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये घेण्यात आली. या पिकनिकमध्ये एकूण 20 हजार लोक सहभागी झाले होते. या पिकनिकच्या इतिहासातील काही रंजक गोष्टींची माहिती घेतली. आता ही पिकनिक नेमकी कधी आणि कुठे साजरी करायची याची माहिती घेऊ या..
International picnic day निमित्त अभिनेत्रींचा परदेश दौरा; पाहा खास फोटो
दिल्लीतील फेमस पिकनिक स्पॉट म्हणजे इंडिया गेट. येथे दूरवर हिरव्या गवताची मैदाने पसरली आहेत. येथे चमचमीत स्ट्रीट फूडचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकता. राजधानी दिल्लीतील लोधी गार्डन निसर्ग अनुकूल पिकनिक स्पॉट आहे. येथील हिरवळ आणि शांत वातावरण सहलीसाठी एक चांगले ठिकाण आहे. या व्यतिरिक्त राजधानी दिल्लीत अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी तुम्ही मोठ्या उत्साहात भेटी देऊ शकता.
कोकणातील कर्नाळा हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. येथील पक्षी अभयारण्याला भेट देणे म्हणजे अनोखी पर्वणीच. येथील पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे.
‘दरोड्याची पोलखोल करणार’ ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी राऊतांचा नार्वेकर-शिंदेंवर हल्लाबोल
कोकणातील आणखी एक लोकप्रिय ठिकाण म्हणजे कोलाड. मुंबईजवळ असलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खास लोकप्रिय आहे. तुम्ही या ठिकाणी भेट दिलीत तर येथील ताम्हिणी घाट, भिरा धरण, सुतारवाडी तलाव, प्लस व्हॅली, गायमुख, देवकुंड धबधबा ही ठिकाणेही तुम्हाला पाहता येतील. या व्यतिरिक्त लोणावळा, माथेरान, खंडाळा, कामशेत, माळशेज घाट, लवासा, पाचगणी या प्रसिद्ध पर्यटन स्थळी देखील तुम्ही भेट देऊ शकता.