Download App

Ahmednagar Loksabha चा गड कोण राखणार, विखे की लंके? काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज?

Ahmednagar Loksabha साठी एक्झिट पोलमध्ये निलेश लंके आघाडीवर असल्याचे दिसते तर सुजय विखे यांना कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Image Credit: letsupp

Ahmednagar Loksabha Who will win Vikhe or Lanke : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी ( Ahmednagar Loksabha ) मतदान प्रक्रिया पार पडली. आता येत्या 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोलचे ( Exit Poll ) आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नगर दक्षिणेमधून सुजय विखे की निलेश लंके कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल हाती आले आहेत. त्या एक्झिट पोलमध्ये नगरमध्ये निलेश लंके ही आघाडीवर असल्याचे दिसते तर सुजय विखे यांना कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहमदनगर दक्षिण मधून लंके आघाडीवर

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आता माध्यमांमध्ये एक्झिट पोलचे आकडे जाहीर होत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. यातच हाती आलेल्या टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार अहमदनगर दक्षिणेमध्ये निलेश लंके हे आघाडीवर असल्याचे दिसून येत असून सुजय विखे यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांच्या अनेक एक्झिट पोल मध्ये लंके हे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा एक्झिट पोल असून अंतिम निकाल हा चार जून रोजी जाहीर होणार असल्याने कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार हे त्या दोन दिवसात स्पष्ट होईल.

लोकसभेच्या निकालानंतर देशपातळीवर मोठी भाकरी फिरणार; उच्च पदासाठी विनोद तावडे चर्चेत

लंकेने केला मोठा दावा

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे तत्पूर्वी अहमदनगर दक्षिण मधून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे. आपण तब्बल दोन लाख मतांनी निवडून येणार असा दावा लंके करत आहेत. जनता आपल्या पाठीशी असल्याने विजय आपलाच असे देखील लंके म्हणाले. दरम्यान सुजय विखे यांनी यावर ते अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान कामांच्या पाठीशी असून पुन्हा एकदा सुजय विखे निवडून येणार यामध्ये आम्हाला कोणतीही शंका नाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची हॅट्रीक, एकहाती सत्ता खेचणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

दरम्यान महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान ही प्रक्रिया पार पडली. यंदाची निवडणूक ही बहुतांश मतदारसंघांमध्ये अटीतटीची होणार असे दिसून येत आहे. दरम्यान एक्झिट पोल च्या आकडेवारीनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठाण्याचे शक्यता आहे तर त्या खालोखालच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या निवडणुकीत अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटांना चांगला धक्का बसण्याची शक्यता दिसते आहे.

follow us

वेब स्टोरीज