लोकसभेच्या निकालानंतर देशपातळीवर मोठी भाकरी फिरणार; उच्च पदासाठी विनोद तावडे चर्चेत

  • Written By: Published:
लोकसभेच्या निकालानंतर देशपातळीवर मोठी भाकरी फिरणार; उच्च पदासाठी विनोद तावडे चर्चेत

नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार तिसऱ्यांना सत्तेत विराजमान झाल्यानंतर देशपातळीसह राज्य पातळीवर भाजप पक्ष संघटनेत मोठी भाकरी फिरण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे. या संकेतांनुसार राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते राज्य पातळीवर मोठे उलटफेर होतील असे सांगितले जात असून, भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील मानाच्या पदासाठी विद्यामान राष्ट्रीय सरचिटनीस विनोद तावडेंचे (Vinod Tawde) नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर या पदासाठी तावडेंची वर्णी लागली तर, ही बाब संपूर्ण मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची असणार आहे. (Vinod  Tawde Name In Race For BJP President After J.P.Nadda )

K Annamalai : भाजपच्या चाणक्याला ‘बड्डे’ च्या दिवशीच मिळणार खासदारकीचं गिफ्ट

तावडेंचे नाव का आहे चर्चेत?

सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचा (J.P. Nadda) कार्यकाळा 6 जून रोजी संपणार आहे. गेल्यावेळी नड्डांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ जून 2023 मध्ये संपला होता. त्यावेळी त्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, यावेळी मुदतवाढ दिली जाते की नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर नड्डांना मुदतवाढ देण्यात आली नाही तर, या पदासाठी भाजपचे विद्यमान सरचिटणीस विनोद तावडेंचे नाव आघाडीवर आहे.

भाजपातंर्गत दर तीन वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जातो किंवा अध्यक्षांना पुन्हा संधी दिली जाते. अध्यक्षाला मुदत वाढ देण्यात येते, असे दरेकर म्हणाले. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जून महिन्यात संपला होता. त्यावेळी त्यांना एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली होती. भाजप पक्ष घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येते. त्यामुळे 4 जूनच्या निकालापूर्वी अथवा नंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते आणि नावाची घोषणा होऊ शकते असे सांगितले जात आहे.

“उद्धव ठाकरेंचे मोदींना मेसेज, त्यांना ‘एनडीए’त यायचंय”; CM शिंदेंच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा

तावडेंसह अनेक नावे चर्चेत

भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यातील विनोद तावडे यांच्यासह मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी समोर येत आहेत. देशपातीवर अध्यक्ष बदलण्याशिवाय महाराष्ट्र भाजप संघटनेतही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संघटनात्मक बदलांवर काय म्हणाले दरेकर

राज्यातील भाजप नेते विनोद तावडे यांचे नाव पण राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांचे नाव चर्चेत असेल तर, ही बाब महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांसाठी अभिमानाची आणि आनंदाची असेल. राज्यातील संघटनेत काय बदल होऊ शकतात याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व आणि संसदीय मंडळ ठरवत असतं असे दरेकर म्हणाले. बदल ही भाजपमधील एक प्रकिया आहे.

Maharashtra Exit Poll : सांगलीत ‘नो मशाल’ ओन्ली ‘विशाल’; मविआत काँग्रेसने केली खेळी

अन्य पक्षांमध्ये त्या ठिकाणी एकच अध्यक्ष असतो. एकच नेतृत्व असतं परंतु भाजप असा एकमेव पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने पक्षांतर्गत सुद्धा निवडणुका किंवा नेमणुका करतो असेही ते म्हणाले. भाजप पक्ष घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येते. त्यामुळे 4 जूनच्या निकालापूर्वी अथवा नंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते आणि नावाची घोषणा होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे आता या पदावर विनोद तावडेंची वर्णी लागते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज