Download App

वसंतदादांचं उदाहरण देत अजितदादांनी सांगितला पराभवाचा इतिहास

Ajit Pawar यांचा सध्या पत्नी सुनेत्रा पवारांसाठी सभांचा धडाका सुरू आहे. त्यात त्यांनी शरद पवारांना वसंतदादांचं उदाहरण देत टोला लगावला

Ajit Pawar Criticize Sharad Pawar in Indapur : उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचा सध्या महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका सुरू आहे. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सभा घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यावर निशाणा साधला.

न्यूयॉर्क मधील मायकेल जॅक्सनवर आधारित ‘एमजे: द म्युझिकल’ शोवरून अभिनेता बनवणार सिनेमा

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आमचं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. आमचे थोरले काका वसंतदादा पवार पोट निवडणुकीला उभे होते. त्यावेळी पवार साहेब विद्यार्थी होते. मात्र पूर्ण कुटुंब वसंतदादा पवारांच्या पाठीमागे असताना त्यांनी दादांना विरोध केला. त्यामुळे ही सुरुवात काही नवीन नाही. तसेच 2004 ला देखील राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र साहेबांनी ती नाकारली. त्यामुळे असं वाटतं की, आता केलं ते 2004 ला केलं असतं तर बरं झालं असतं.

Sex Tape Case : प्रज्वल रेवन्नांच्या अडचणी वाढल्या; SIT ने जगभरात जारी केली लुकआऊट नोटीस

त्यानंतर 2014 ला देखील अचानक प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यावेळी मी विचारलं असता पटेल म्हणाले होते की, ही आपली स्ट्रॅटेजी आहे. मग त्यांनी केली की, स्ट्रॅटेजी आणि मी केली की, गद्दारी असं कसं? असा सवाल अजित पवारांनी केला.

तसेच अजित पवार म्हणाले की, पवार कुटुंबाचा 1962 चा इतिहास आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे वसंतदादा पवारांच्या पाठिमागे सर्व कुटुंब असताना ते त्यांचा प्रचार करत असताना देखील ते पराभूत झाले आणि कुटुंबातील एकटा माणूस पाठिंबा देत असलेली जागा जिंकली. यावेळी देखील तसंच होणार आहे. कारण आम्ही कामाची माणसं आहोत. असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा पवारांवर टीका केली.

follow us