Download App

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणाले अन् स्वत: मुख्यमंत्री झाले, शिंदेंचा ठाकरेंवर प्रहार

  • Written By: Last Updated:

Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत बोलत होते. तसंच, आता फक्त शिवसेना भाजप सोबत नसून राष्ट्रवादी, रिपाई, कवाडे गड, मनसे असे सर्वजण सोबत आहोत. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे. आता आपण कार्यकर्ते म्हणून आणि (Yavatmal-Washim Lok Sabha) महायुतीचे समर्थक म्हणून आपल्या राजश्री पाटील ताईंना (Rajshri Patil) निवडून द्या अशी विनंतीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

 

घरात बसून सल्ले देतात

हा एकनाथ शिंदे उंटावरून शेळ्या राखणारा नाही तर लोकांच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊन थेट मतद करणारा माणूस आहे. मी फेसबूक लाईव्ह करून सरकार चालवत नाही असा नाव न घेता शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना टाला लगावला आहे. तसंच, घरात बसून काही लोक आम्हाला सल्ले देतात असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

 

मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली

या देशात विकासाची गंगा आलेली आहे. या देशात रामाचा मंदिर झालं आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. तसंच, राम मंदिर वहीं बनाएंगे पण तारीख नही बनाएंगे असं काही लोक म्हणत होते. मात्र, मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली असंही शिंदे म्हणाले.

 

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला

उबाठावाले म्हणाले होते बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे. मात्र, बाळासाहेबांचा शिवसैनिक सोडून स्व: मुख्यमंत्री पदावर बसले असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसंच, सामान्य शेतकऱ्याचा मुलगा यांना मुख्यमंत्री झालेलं जमत नाही असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

 

काँग्रेसला 2024 चं काय 2034 पर्यंतही सत्ता मिळणार नाही

यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरही टीका केली. कॉंग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. मात्र, गरिबी नाही तर गरिबचं हटले अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली. तसंच, हे विरोधक अहंकाराने भरलेले आहेत अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर काँग्रेसला 2024 चं काय 2034 पर्यंतही सत्ता मिळणार नाही असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.

follow us