Download App

काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार उतरविला ! अकोल्यातून डॉ. अभय पाटलांना उमेदवारी

  • Written By: Last Updated:

Congress candidate from Akola announced : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाच उमेदवाराचे नाव आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांचे नाव चर्चेत होते. त्यानांच काँग्रेसने अखेर उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला नागपूर आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसही अकोल्याचा जागेवर प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देईल, असे बोलले जात होते. परंतु आता प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने (Congress) उमेदवार उतरविला आहे.

भावना गवळींच्या उमेदवारीवरुन रणकंदन! ‘…तर सामूहिक राजीनामे देणार’, CM शिंदेंना कडक इशारा

अकोला लोकसभा मतदारसंघाबरोबर तेलंगणातील एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने वारंगलमधून कादियाम काव्या यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने अकोल्यात उमेदवार दिल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपने येथून खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा मतदार आहेत. त्यामुळे स्वतः प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर आता काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिन्ही उमेदवारांना मानणारा मतदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

‘बारामतीतून सुरु झालेला प्रवास..,’; पंकजा मुंडेंचा जानकरांना मिश्किल टोमणा

नाना पटोलेंची खेळी
दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले हे भाजपला मदत करतात. नांदेडच्या जागेवरून अशोक चव्हाण व पटोले यांची फिक्सिंग झाल्याचा आरोप आंबेडकरांनी केला होता. त्यावरून नाना पटोले ही चिडलेले दिसले. त्यामुळे काँग्रेसने येथून उमेदवार मैदानात उतरविला आहे.

follow us