‘बारामतीतून सुरु झालेला प्रवास..,’; पंकजा मुंडेंचा जानकरांना मिश्किल टोमणा

‘बारामतीतून सुरु झालेला प्रवास..,’; पंकजा मुंडेंचा जानकरांना मिश्किल टोमणा

Pankaja Munde On Mahadev Jankar : बारामतीतून सुरु झालेला प्रवास भटकत-भटकत परभणीत येऊन थांबला असल्याचा टोमणा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मानलेला भाऊ महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना लगावला आहे. दरम्यान, परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून महादेव जानकरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत मुंडे बोलत होत्या.

मी वाट पाहतोय! महादेव जानकरांसाठी मोदींचा खास संदेश; फडणवीसांनी जाहीर सभेतच सांगितला

पंकजा मुंडे म्हणाल्या, महादेव जानकर यांनी बारामतीची निवडणूक लढली होती. तेव्हा ते जेथे जागा मिळेल तेथे झोपायचे. सामान्य माणसांबरोबर राहून जेवण करायचे. पण या माणसाने इतिहास रचला. त्यानंतर ते विधानपरिषदेवर गेले आणि मंत्री होऊन अतिशय चांगले काम केले. सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी घर सोडले. आता ते परभणीमधून लढत आहेत. पण ते बाहेरून आल्याचा आरोप त्यांच्यावर होत असला तरी तसा विचार करण्याचे काही कारण नाही. सर्वसामान्य माणसांसाठी, भटक्या विमुक्तांसाठी काम करणारा माणूस भटकत-भटकत काम करत असतो. त्यांचा बारामतीमधून सुरू झालेला प्रवास भटकत-भटकत परभणीत येऊन थांबला असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

मोहिते-पाटलांचे ठरेना… माढ्याच्या मैदानात नवा भिडू; प्रवीण गायकवाडांनी घेतली पवारांची भेट

जानकरांसाठी पंतप्रधान मोदींचा खास संदेश…
पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले असता त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली. तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार असल्याचं सांगितल्यानंतर मोदी म्हणाले, जानकरांना सांगा, मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मोदींसाठी जाकरांनासारखा एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का? असा देवेंद्र फडणवीसांनी परभणीकरांना सवाल विचारला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज