Devendra Fadnavis said Pm Narendra Modi’s message : महादेव जानकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी एक खास संदेश दिला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रासपचे महादेव जानकरांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून (Parbhani Loksabha) उमेदवारी मिळाली. महादेव जानकरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. जानकरांना सांगा मी त्यांची लोकसभेत वाट पाहत असल्याचा खास संदेश मोदींनी परभणीकरांना दिला असल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.
Liquor Scam : केजरीवालांनी चौकशीत सांगितली आतिशी अन् सौरभ भारद्वाज यांची नावे; ईडीचा मोठा दावा
फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले असता त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली. तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार असल्याचं सांगितल्यानंतर मोदी म्हणाले, जानकरांना सांगा, मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मोदींसाठी जाकरांनासारखा एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का? असा देवेंद्र फडणवीसांनी परभणीकरांना सवाल विचारला आहे.
महादेव जानकरांची मुर्ती लहान पण किर्ती महान आहे. पाच वर्षे माझ्यासोबत त्यांनी काम केलं आहे, त्यांनी कधीच कुरकुर केली नाही. मंत्रिपद असूनही पाच वर्षांत एक रुपयाचा डागही जानकरांवर कोणी लावू शकला नाही. हा नेता फाटकात आला आणि फाटकातच राहिला जन्मभर फाटकातच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तसेच महादेव जानकरांची श्रीमंती इथल्या दलित भटक्या समाजाच्या मनात आहे. यंदाच्या निवडणुकीत आम्ही मागील वर्षीचा 41 रेकॉर्ड मोडून काढणार असून यावेळी खासदारांमध्ये पंकजा मुंडे आणि रासपचे महादेव जानकरही असणार असल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये ट्विस्ट! बाबर आझम पुन्हा कॅप्टन; ‘या’ खेळाडूला कर्णधारपदावरून हटवले
संजय जाधवांसाठी आम्हीच मते मागायचो पण…,
जुने खासदार संजय जाधव यांच्यासाठी आम्हीच मते मागायचो पण सुदैवाने ते निवडून आल्यानंतर मला,. दिल्लीत लोकसभेला अन् जनतेलाही विसरुन जायचे. निवडणूक आली की मते मागायची निवडून यायंच अन् विकास सोडून द्यायचा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
अजितदादांचे आभार..
महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे परभणी लोकसभेची जागा जाताच आम्ही अजित पवार यांच्याकडे महादेव जानकरांसाठी विनंती केली होती. अजितदादांनीही विनंतीला मान देऊन लगेचच महादेव जानकरांना परभणी लोकसभेची जागा दिली असल्याने अजित पवार यांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मानले आहेत.
शक्तीपीठ महामार्ग परभणीतून जाणार…
समृद्धी महामार्ग परभणी जिल्ह्यातून गेला नसल्याची खंत आम्हालाही आहे. त्यामुळेच आता पुढील नागपूर ते गोव्याला जाणारा शक्तीपीठ महामार्ग परभणीतून जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली आहे. या महामार्गाच्या दुतर्फा औद्योगिक, कृषी विकासाच्या योजना, अनेक योजना तयार करणार आहोत. शक्तीपीठ महामार्गामुळे उद्योगांसाठी महत्वाचं योगदान होणार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीकरांना दिला असल्याचं जाहीरपणे आवाहन केलं आहे. रासपचे महादेव जानकर यांची महायुतीसोबत युती झाली असून जानकरांची आधी महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, अचानक परभणी मतदारसंघातून महायुतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या परभणीमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत. परभणीतून संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यात लढत होणार आहे. महादेव जानकर यांना अद्याप कोणतंही चिन्ह मिळालं नसून त्यांनी अर्ज भरताना तीन चिन्हे सुचविली आहेत.