Download App

मतदानात बंगाल पुन्हा आघाडीत! देशात सहाव्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 57.7 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 Sixth Phase Of Voting: आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी देशातील 58 मतदारसंघात मतदान पार पडले

Image Credit: letsupp

Lok Sabha Election 2024 Sixth Phase Of Voting: आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सहाव्या टप्प्यासाठी देशातील 58 मतदारसंघात मतदान पार पडले. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीच्या सर्व 7 जागांसह उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील सर्व 10 जागा, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ, ओडिशातील सहा, झारखंडमधील चार आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश होता.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशातील 11.13 कोटीहून अधिक लोक मतदानासाठी पात्र होते. त्यामध्ये 5.84 कोटी पुरुष, 5.29 कोटी महिला आणि थर्ड जेंडर मतदारांची संख्या 5,120 होती.

सहाव्या टप्प्यात बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58 जागांवर 57.70 टक्के मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99 टक्के मतदान झाले तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 51.35 टक्के मतदान झाले.

सहाव्या टप्प्यात कुठे आणि किती मतदान?

बिहार- 53.30 टक्के

हरियाणा- 58.37 टक्के

जम्मू आणि काश्मीर- 52.28 टक्के

झारखंड- 62.74 टक्के

दिल्ली- 54.48 टक्के

ओडिशा- 60.07 टक्के

उत्तर प्रदेश- 54.03 टक्के

पश्चिम बंगाल- 78.19 टक्के

दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले

आज झालेल्या सहाव्या टप्प्यातील मतदानात अनेक उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले होते त्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (भाजप), मनोज तिवारी (भाजप), कन्हैया कुमार (काँग्रेस), मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), मनोहर लाल खट्टर (भाजप) यांचा समावेश होता.

पोर्शे कार अपघात प्रकरणात सायबर सेलची मोठी कारवाई, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पाच टप्प्यात किती मतदान झाले?

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के, चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के आणि पाचव्या टप्प्यात 62.20 टक्के मतदान झाले आहे.

follow us

वेब स्टोरीज