Download App

Lok Sabha Election: बारामतीचे गणित बदललं; सुनेत्रा पवार यांच्याऐवजी जानकर भाजपचे उमेदवार?

  • Written By: Last Updated:

Mahadev Jankar May Contest from Baramati Loksabha: लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाआघाडी अशी लढत रंगणार आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) चुरशीची लढत होणार आहे. या मतदारसंघात तीन टर्म खासदार सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयीमध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठी दोन्हीकडून जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे महायुतीचे घटक राहणार आहेत, हे आजच नक्की झाले आहे. महादेव जानकर यांना परभणीतून लोकसभेच्या मैदानातून उतरले जाईल, अशी चर्चा होती. परंतु महादेव जानकर हे आता बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रिंगणात उतरतील, अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. तसे झाले तर सुप्रिया सुळेविरुद्ध (Supriya Sule) महादेव जानकर अशी टफ फाईट होईल.

शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान, त्यांचा राजकीय अंत जवळ; मिटकरींचा पलटवार

रविवारी हा राज्यातील राजकीय घडामोडीचा दिवस राहिला. महाविकास आघाडीला आज दोन मोठे धक्के बसले. काँग्रेसचे विदर्भातील आमदार राजू पारवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. ते रामटेकमधून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. परंतु महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवारांना आज एक मोठा धक्का बसला. कारण महादेव जानकर यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शरद पवार हेच इच्छुक होते. या मतदारसंघातील जातीय समीकरणाचा फायदा बारामती लोकसभेत लेक सुप्रिया सुळेंना होणार होता. परंतु त्याला देवेंद्र फडणवीस यांनीच सुरुंग लावलाय. महाविकास आघाडीकडे आकर्षित झालेले जानकर हे महायुतीमध्येच राहणार हे आज नक्की झाले. बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारही मोठ्या संख्येने आहेत. जानकर हे धनगर समाजाचे आहेत. इंदापूर, बारामती, दौंड या मतदारसंघात धनगर समाजाची मोठी व्होट बँक आहे. त्याचा विचार करता महादेव जानकरांना भाजप येथून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

अजित पवार एकटे पडल्याने अडचण ?

अजित पवार हे आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. परंतु अजित पवार हे मतदारसंघात एकटे पडले आहेत. अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार, पुतण्या युगेंद्र हे सुप्रिया सुळेंच्या मदतीला आले आहेत. ते थेट प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे अजितदादांची कोंडी झाली आहे. शरद पवार व सुप्रिया सुळेंना यांच्या भावनिक आवाहनाला मतदारांनी साथ दिल्यास सुनेत्रा पवार या पराभूत होऊ शकतात, अशी भितीही अजितदादांना एकप्रकारे आहे.

जानकरांना उमेदवारी का ?

महादेव जानकर यांनी यापूर्वी शरद पवारांविरोधात भूमिका घेतलेली आहे. 2014च्या निवडणुकीत जानकर हे बारामतीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी जानकर हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले नव्हते. ते आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास ते जिंकून येतील, असा विश्वास भाजपला आहे. तसेच अजित पवार हे त्यांना साथ देतील, त्याचा फायदा होईल.

बच्चू कडू नवनीत राणांचं गणित बिघडविणार? राज्यात युती पण अमरावतीत..,


तर हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे शांत बसणार ?

या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील व माजी विजय शिवतारे हे थेट अजित पवारांना विरोध करत आहेत. शिवतारे यांनी तर थेट शरद पवार व अजित पवारांवर थेट हल्ला सुरू केला आहे. या मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भाषाही शिवतारे यांनी सुरू केली आहे. तर हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार गटाकडून धमक्या येत असल्याचा आरोपही केला आहे. ते थेट देवेंद्र फडणवीसांचा कानावर घातले आहे. महादेव जानकरांना उमेदवारी दिल्यास हे दोघे शांत बसतील. ततेच ओबीसी मतदार आणि येथील मराठा नेत्यांच्या जोरावर ही जागा निवडून येईल, असा भाजपचे गणिते आहेत. त्यामुळे जानकर येथून उमेदवार राहतील, असे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.

follow us