सुळेंना टफ देण्यासाठी सुनेत्रा पवारांची राजकीय बॅटिंग; अधिकृत उमेदवारीपूर्वीच थोपटले दंड
Sunetra Pawar : मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lokabha) निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. बारामतीकरांकडूनही त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आज अखेर सुनेत्रा पवार यांनी आपल्या उमेदवारीबाबत मोठं विधान केलं आहे. प्रदेशाध्यक्षांनी बारामतीच्या उमेदवारीवर माझंच नाव घेतलं असल्याचं सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बारामतीतून सुनेत्रा पवार लोकसभेसाठी उभे राहणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. इंदारपुरातील आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होत्या.
शिवसेनेच्या कोट्यातील आठ जागा भाजपला अन् चार राष्ट्रवादीला? ’32’ मतदारसंघात ‘कमळाचे’ उमेदवार
या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, जनेतेने संधी दिल्यास अजितदादा आणि मी अडचणी सोडवण्यासाठी दोघे मिळून प्रयत्न करणार आहोत. कालच प्रदेशाध्यांनी बारामतीसाठी माझं नाव घेतलं आहे. याआधी मी बोलले नाही पण आज पहिल्यांदाच बोलत आहे. जनतेकडून तर माझी आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं, तरी म पहिल्यांदा बोलत असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
‘आदित्य ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांची घेतली भेट’; शिंदे गटाच्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ!
तसेच अजितदादांनी केलेल्या मोठ्या विकासकामे पाहुन मला अभिमान वाटतो. जतनेच्या प्रतिक्रिया ऐकून वाटतं की दादांनी शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळात देखील आम्ही तुम्ही अडचणी सोडवण्याचं आश्वासनच सुनेत्रा पवार यांनी दिलं आहे.
रणदीप हुड्डाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमच्यात सगळंच फाटलं असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. तर पवार कुटुंब आणि पक्षात फूट नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढील काळात जर सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर नणंद भावजयी अशी लढत संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.