Download App

सुप्रिया सुळेंसाठी पवारांनी गुंडाळलं जुनं वैर; थोपटेंनंतर काकडे अन् भाजप नेते चंद्रराव तावरेंसोबत खलबतं

Image Credit: letsupp

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे विशेष लक्ष लागले आहे. कारण याठिकाणी पवार विरूद्ध पवार म्हणजे सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्यात सुळेंसाठी स्वतः शरद पवार ( Sharad Pawar ) हे कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सुप्रियांना पाठिंबा मिळावा म्हणून पवारांनी आता थेट जुनं वैर गुंडाळलायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये त्यांनी अगोदर कट्टरविरोधक असणारे अनंतराव थोपटे,यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ( 12 एप्रिल ) काकडे आणि आता भाजप नेते चंद्रराव तावरेंसोबत खलबतं केली आहेत.

Ahmednagar Lok Sabha : महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांची पाठ; नगर-शिर्डीत पाटी कोरी

अनंतराव थोपटे, काकडे यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी आता कट्टर विरोधक असणाऱ्या भाजप नेते चंद्रराव तावरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवार हे बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी ऍड. आर एन जगताप यांचं नुकतंच निधन झालं होत यानिमित्त शरद पवार हे सांत्वन भेट घेण्यासाठी आले होते. अचानक शरद पवार यांनी राजकीय कट्टर विरोधक असलेले चंद्रराव तावरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचे चंद्रराव तावरे यांनी सांगितलं आहे.

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेने शेअर केले बोल्ड फोटो

या भेटीनंतर अनेक चर्चांना उधान आले होते. तसेच पवारांची तावरेंसोबत बंद दाराआड काय चर्चा झाली याची उत्सुकता वाढली होती.मात्र लगेचच या भेटीवर स्वतः तावरे यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, मला माहित नव्हत की, पवार येणार होते. त्यावेळी दोन पत्रकारांनी मला येऊन सांगितलं की, पवार माझ्याकडे येत आहेत.

मोदींसाठी मनसेचं इंजिन मैदानात पण, मोहोळ अन् सुनेत्रा पवारांच्या पत्रकांमुळे मनसैनिक कन्फ्युज….

तसेच आमच्यामध्ये बंद दाराआड अशी काहीही चर्चा झालेली नाही. त्यांनी मला केवळ हाल-हवाल आणि आम्ही एकमेकांच्या मुलाबांळांबद्दल तब्बेतीबद्दल विचारले. त्यामुळे गुगली टाकणे आणि गोलमोल करण्यासाठी यासाठी बंद दाराआड चर्चा वैगेरे ती पवारांची खासियत असते. दरम्यान भाजप नेते चंद्रराव तावरे यांनी 1997 ला पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर जवळपास पवारांनी तावरेंची 27 वर्षांनंतर भेट घेतली आहे.

त्या अगोदर शरद पवारांनी निंबोत या ठिकाणी संभाजीराव आणि बाबाराव काकडे कुटुंबीयांची सांत्वनवर भेट घेतली. शरद पवारांची ही भेट देखील जवळपास 55 वर्षांनी झाली आहे. 1970 च्या दशकापासून बारामतीमध्ये पवारांनी काकडे या गटातील वाद गाजत होता. पवारांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख आहे. मात्र 2018 मध्ये पवारांनी काकडे जुळवून घेत सतीश काकडे यांचे पुत्र अभिजीत यांना सोमेश्वर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंसाठी पवारांकडून या भेटीगाठींचं सत्र सुरू झालं आहे.

follow us

वेब स्टोरीज