Anandraj Ambedkar Amravati Loksabha 2024 : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. (Amravati Lok Sabha Constituency) दोन दिवसांपूर्वी भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना अमरावतीमधून उमदेवारी दिली. त्यानंतर या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली. अशात आता अमरावती लोकसभेच्या रिंगणात आता आणखी बड्या नेत्याने उडी घेलती. रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शनिवारी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
बारामतीत नणंद-भावजयमध्येच फाईट; सुळेंच्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर
2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार
भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिल्यानंतर बच्चू कडू यांनी राणांविरोधात उमेदवार उभा केला. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही अमरावतीमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात आनंदराज आंबेडकर यांनी उडी घेतली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बारामतीत नणंद-भावजयमध्येच फाईट; सुळेंच्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर
अमरावतीचा विकास थांबला
या विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न असून, स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत. अमरावती हा विदर्भातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे. मात्र त्याचा विकास थांबला आहे. त्यामुळेच आपण लोकसभा लढणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं.
ते म्हणाले की, अमरावतीतील सर्वसामान्य जनता, विदर्भातील विविध संघटना आणि स्थानिक लोकांनी मला लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची विनंती केली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळेच मी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली लढण्याची विनंती
अमरावतीतून वंचिनेत प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढविल्यास आंबेडकरी मतांची विभागणी होऊ शकते, अशी चर्चा आहे. याबाबत आनंदराज आंबेडकर यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता साफ फेटाळून लावली. वंचितच्या कार्यकर्त्यांनीच मला अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराबाबत वंचित कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आंबेडकर या नावाला वलय आहे. त्यामुळे आंबेडकर जेव्हा निवडणुकीत उभे राहतात तेव्हा समाज त्यांच्या मागे असतो. आंबेडकर कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले तर फरक पडत नाही, असं आंबेडकर म्हणाले.