Uddhav Thackeray on PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकींच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे माझे शत्रू नाहीत, उद्या कोणतेही संकट आलं तर मी त्यांच्या मदतीला धावून जाईल, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलं. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.
…तेव्हा कोकणात यांच्यासारखे दलाल फिरत नव्हते; राज यांचा उद्धव ठाकरे, विनायक राऊतांवर निशाणा
उद्धव ठाकरे यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काल-परवा मोदींनी मुलाखत दिली. त्यात ते काहीतरी बोलले. यानंतर अनेकांनी मला मेसेज करत मोदींना तुमचे प्रेम कसे आले? अशी विचारणा केली. मी पण त्यांना म्हणालो, माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. पण, मोदींचे प्रेम इतके उतू गेले आहे की, ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. त्यांच्याबद्दल मला प्रेम आणि आपुलकी आहे. मग मी ज्यावेळी दवाखान्यात होतो, तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. मग हे जर खरं असेल तर ते तुमच्या खालच्या लोकांना माहिती नव्हतं का? असा सवाल ठाकरेंनी केला.
‘गाडायला आणि वाकायलाही ताकद लागते’,नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला
ते म्हणाले, एकीकडे तुम्ही चौकशी करत होता, मग तुमचे पाव मुख्यमंत्री फडणवीस यांना याची माहिती नव्हती का? गद्दार आणि फडणवीस हे रात्री गाठीभेटी घेत होते, माझे सरकार पाडायचं ठरवत होते, हे तुम्हाला माहिती नव्हतं का? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आज तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंवर काही संकट आले तर मी धावून जाईल. पंतप्रधान मोदींवरही संकट आलं तर मी देखील धावून जाईल. फक्त तुम्ही महाराष्ट्र आणि देशावर संकट म्हणून आलात, त्यावर आवर घाला, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला.
अमित शहा, तुम्ही काल मला काही मुद्द्यांवर बोलण्याचे आव्हान दिलं. मी सर्व मुद्द्यांवर बोलण्यास तयार आहे. जर तुमच्यात थोडी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला. मराठवाड्याला पाणी कधी देणार? केंद्र सरकारने दहा वर्षांत मराठवाड्याला काय दिले? ईडी, सीबीआय यांचे घरगडी आहे. मात्र 4 जूननंतर हे सर्व घरगडी आपल्याकडे येणार आहे. शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या ईडी आणि सीबीआयलाही पाहून घेऊ, असा इशारा ठाकरेंनी दिला.