Download App

तथाकथित हिंदू रक्षक म्हणत अमित शाहांची ठाकरेंवर टीका, म्हणाले, ‘तुम्ही बाळासाहेबांचे सगळे संस्कार…’

  • Written By: Last Updated:

Amit Shah on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana’s) प्रचारार्थ आज सभा झाली. या सभेला संबोधित करतांना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार निशाणा साधला.

Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? शाह यांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना शाह म्हणाले, उमेश कोल्हे यांची हत्या झाली आणि त्यावेळी तथाकथित हिंदू रक्षक असलेले उद्धव ठाकरे हे काहीही करू शकले नाही. त्यांनी काहीच केलं नाही. उद्धवबाबू, तुम्ही बाळासाहेबांचे सारे संस्कार सोडले आहेत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे सर्व संस्कार घेऊन पुढे जात आहेत. आता आमचे सरकार आहे, ते एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे सरकार आहे. त्यामुळं आता उमेशची हत्या होणार नाही. तसं करण्याची कोणाची हिंमतही होणार नाही,असं शाह म्हणाले.

‘आम्ही नौटंकी केली तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही’; कडुंनी राणांना सज्जड दम भरला… 

पुढं बोलतांना शाह म्हणाले, स्वत:ला शिवसेनेचे अध्यक्ष समजणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, नकली सेनेचे अध्यक्ष सोनियाजींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाहीत, अशी टीका शाह यांनी केली.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र प्रकृतीच्या कारण सांगून ते आले नाही. मात्र आता शरद पवार निवडणूक प्रचारासाठी फिरत आहेत, विरोधकांनी प्रभू श्रीरामचंद्राचा अपमान केल्याचा टोला शाह यांनी लगावला.

शाह म्हणाले, भाजपला 400 जागा मिळवून संविधान बदलायचं, असा खोटा अपप्रचारा कॉंग्रेस करतेय. आम्हाला हे करायचे असते तर 2014 पासून आमचं पूर्ण बहुमत आहे, तेव्हाच केलं असतं. मात्र आम्ही तसं केलं नाही. आम्ही संविधान बदलणार नाही, आणि कुणाचं आरक्षणणही काढणार नाही. बहुमताचा वापर 370 हटवण्यासाठी, तिहेरी तलावर बंदी घालण्यासाठी केला, असं शाह म्हणाले.

follow us