Download App

PM Modi : कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा, पीएम मोदींचा ‘मविआ’ सरकारवर हल्लाबोल

PM Narendra Modi : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Lok Sabha)महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांच्या प्रचारसभेचा नारळ आज फोडला. चंद्रपूरमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. यावेळी पीएम मोदींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. देशावर जोपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती, तोपर्यंत महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. त्याचवेळी महाविकास आघाडीवर देखील जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात जोपर्यंत त्यांची सत्ता होती, तोपर्यंत त्यांनी फक्त स्वतःचाच विकास करण्यावर भर दिला, कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा असं धोरण महाविकास आघाडीच्या सरकारचं होतं, अशीही घणाघाती टीका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Love Jihad चा आरोप करत तरूणाला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत. चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-एनडीएच्या मेहनती उमेदवारांना विजयी करण्यासाठी माझ्या कुटुंबीयांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे.

नार्को टेस्ट केल्यास काँग्रेस नेतेही म्हणतील मोदीच पंतप्रधान होणार; मोदींसमोर मुनगंटीवारांचा जोरदार हल्ला

चंद्रपुरातील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चंद्रपूरचे इतके प्रेम मिळणे माझ्यासाठी विशेष आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी लाकूड पाठवणारे चंद्रपूरच आहे. संसदेच्या नवीन इमारतीतदेखील चंद्रपूरचे लाकूड वापरले गेले आहे.

विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला. विरोधकांनी विकासकामांना सातत्याने विरोध केला. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा योजना सुरु केल्याचे सांगत मोदींनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणूक ही स्थिरता आणि अस्थिरता यांच्यातील निवडणूक आहे. एकीकडे भाजप आणि एनडीए आहेत, ज्यांचे ध्येय देशासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेणे आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि INDIA आघाडीची युती आहे, ज्यांचा मंत्र ‘जहां भी सत्ता पाओ, खूब मलाई खाओ आहे.

कॉंग्रेसच्या काळात सातत्याने दहशतवादी हल्ले झाले. यांनी देशाला धोका दिला आहे. इंडिया आघाडीवाले यांनी केवळ परिवारांचा विकास केला. कडू कारले, साखरेत तळले तरीही कडू ते कडूच असते. हा वाक्यप्रचार कॉंग्रेसला लागू होतो. कारण ते कधीही सुधारु शकत नाही. तोडा आणि राज्य करा अशी कॉंग्रेसची रणनीती आहे. ती या देशातील लोक मंजूर करणार नाही.

follow us

वेब स्टोरीज