Download App

सांगलीत नवा ट्विस्ट; शेंडगेंना धक्का देत आंबेडकरांचा विशाल पाटलांना पाठिंबा

Prakash Ambedkar यांचा सांगलीमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा, यामुळे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांना धक्का बसला आहे.

Prakash Ambedkar support to Vishal Patil instead of Prakash Shendage : सांगलीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कॉंग्रेसच्या विशाल पाटील ( Vishal Patil) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यात महाविकास आघाडीसोबत युतीच्या चर्चा फिस्कटलेल्या वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) आता सांगलीमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा घोषित केला आहे. मात्र यामुळे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे ( Prakash Shendage ) यांना धक्का बसला आहे. कारण वंचितने अगोदर सांगलीमध्ये शेंडगेंना पाठींबा देणार असल्याचं म्हटलं होतं.

Rohit Sharma : हिटमॅन रोहित, रेकॉर्ड्समध्येही अव्वल; क्रिकेटमधील 5 खास कामगिरी..

त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सांगलीत नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. आंबेडकरांनी शेंडगेंना धक्का देत विशाल पाटलांना पाठिंबा दिला घोषित केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या सांगलीमध्ये पाठींबा मिळवण्यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत बैठका सुरू होत्या. मात्र आता आंबेडकरांनी शेंडगेंना धक्का देत विशाल पाटलांना पाठिंबा दिला घोषित केला आहे.

Panchayat 3 Release Date: ‘पंचायत 3’च्या रिलीज डेटविषयी चाहते नाराज; म्हणाले, ‘तुम्ही लोकांची…’

या अगोदर देखील या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं विधान केलं होतं. विशाल पाटील हे सांगलीत रिंगणात उतरल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ, असं आंबडेकरांनी सांगितलं होतं त्याप्रमाणेच त्यांनी आता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांना पाठिंबा जाहिर केला आहे.

दुसरीकडे वंचितकडून आणखी तीन उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण, मुंबई उत्तर मध्य, आणि मुंबई दक्षिण या जागांचा समावेश आहे. या ठिकाणी वंचितकडून अनुक्रमे जमील अहमद, संतोष अंबुलगे आणि अफजल दाऊदानी यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून त्या संदर्भातील ट्विट करण्यात आले आहे. तर याच वेळी वंचितने सांगलीमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

follow us