Ramdas Kadam Interview : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. याच बरोबर विधानसभा निवडणुकीत आम्ही कोकणात धनुष्यबाणाची उणीव भरून काढणार असं देखील रामदास कदम म्हणाले.
या लोकसभेत कोकणात धनुष्यबाण दिसत नाही तुम्ही प्रयत्न करून देखील यावेळी कोकणात धनुष्यबाण दिसत नाही असं प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, यावर बोलताना रामदास कदम म्हणाले रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गिते (Anant Geete) धनुष्यबाण चिन्हावर लढले होते मात्र त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून पराभव झाला होता. सध्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्याने आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे असल्याने रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली.
तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उदय सामंत यांचे बंधूना तिकीट मिळेल असं आम्हला वाटलं होतो मात्र शेवटच्या क्षणी या जागेवर नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र आम्ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोकणात असणारी धनुष्यबाणाची उणीव भरून काढणार याबाबत माझा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलणं झाला आहे असं रामदास कदम म्हणाले.
नारायण राणे यांच्या प्रचाराला जाणार का?
यावर रामदास कदम म्हणाले, मी यावेळी जास्त प्रचार करत नाही. नारायण राणे स्वतः सक्षम आहे. माझा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलणं झालं आहे. मी संभाजीनगर, शिर्डीसह पाच -सहा ठिकाणी मी प्रचार करण्यासाठी जाणार आहे. माझी आणि नारायण राणे यांची मैत्री नाही, त्यांच्याशी माझा काहीच बोलणं देखील झालं नाही असं रामदास कदम म्हणाले.
महायुतीत अनेक मित्र शत्रू बनले असं तुम्हाला वाटते का?
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होत आहे मात्र हे पाहणे महाराष्ट्राला समाधानकार वाटत नाही. अनंत गिते यांना आम्ही सात वेळा निवडून दिले. त्यांच्यासाठी मी पहिली जागा बाळासाहेबांशी भांडून घेतली होती. मात्र त्यांनी मतदारसंघात कोणतीही विकास कामे केली नाही. कोकणाचा मोठा नुकसान अनंत गिते यांनी केला असल्याची टीका रामदास कदम यांनी या मुलाखतीमध्ये केली.
निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानभूती मिळणार का?
यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली होती मात्र आता उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी आघाडी केली. त्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतली.
रणजितसिंह निबाळकरांचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, फडणवीसांचा शरद पवारांना निशाणा
अडीच वर्षात उद्धव ठाकरे फक्त 2 वेळा मंत्रालयात गेले. त्यांनी पुत्रप्रेमात शिवसेना नेत्यांना संपवलं, त्यांनी किती खोके घेऊन अपक्ष आमदारांना मंत्री केले हे मला माहिती नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली.