रणजितसिंह निबाळकरांचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, फडणवीसांचा शरद पवारांना निशाणा

रणजितसिंह निबाळकरांचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, फडणवीसांचा शरद पवारांना निशाणा

Devendra Fadnavis On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज फलटणमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha) महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Nibalkar) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, फलटणकरांनी निर्णय केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून दिल्लीला जाणार आहे. मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निबाळकरांनी देखील उचित निर्णय घेतला असता. काही विषय अस्मितेचे असतात, काही विषय विकासाचे असतात तर काही विषय जनतेचे असतात. अस्मितेचे विरोधात, विकासाच्या विरोधात, जनतेच्या विरोधात निर्णय घेतला तर जनता आपल्याला कधीच लक्षात ठेवत नाही.

आता ही निवडणूक नेत्यांच्या हातात राहिलेली नाही, ही निवडणूक जनतेच्या हातात आहे, कोणीही कितीही प्रयत्न केला तरीही माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर रेकॉर्डब्रेक मतांनी विजय होणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, फलटणकरांनो जेव्हा या लोकसभा मतदारसंघातून देशाचे नेते शरद पवार ( Sharad Pawar) उभे राहिले तेव्हा त्यांनी या मतदारसंघातून पाण्याचा प्रश्न मिटवणार असं सांगतिले होते मात्र ते 5 वर्ष खासदार होते राज्यात त्यांची सरकार होती मात्र तरीही देखील तुम्हाला पाणी मिळाला नाही. यानंतर तुम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून दिले. या पठ्ठ्याने केवळ पाच वर्षात तुम्हाला तुमच्या हक्काचे पाणी आणून दिले. ज्यादिवशी या पठ्ठ्याने तुम्हाला पाणी आणून दिले त्याच दिवशी देशाचे नेत्याने ठरवलं की याचा कार्यक्रम करायचा आणि मग त्या दिवसापासून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कार्यक्रम करायचे अनेक प्रयत्न चालू आहे. मात्र जनता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे आहे.

‘असली नौटंकी खपवून घेणार नाही’ अजित पवारांचा रोहित पवारांवर घणाघात

यामुळे देशाचे नेते असो किंवा परदेशाचे नेते असो कोणीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाकडं करू शकत नाही. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube