Download App

लोकसभेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर, ठाकरेंकडून शेतकरी, तरुणांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा

Shiv Sena Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील वचननाम्याची घोषणा करण्यात

  • Written By: Last Updated:

Shiv Sena Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील वचननाम्याची (Shiv Sena Manifesto) घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून या वचननाम्यात शेतकरी (Farmers) आणि तरुणांसाठी मोठं मोठ्या घोषणा करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षात राज्याचे हक्काचे प्रकल्प गुजरात (Gujarat) व इतर राज्यात पळवून नेण्यात आले, देशात इंडिया आघाडीचे सरकार येताच आम्ही महाराष्ट्रवर होणार हा अन्याय आम्ही पूर्णपणे थांबवू आणि पुन्हा महाराष्ट्राचे वैभव महाराष्ट्राला प्राप्त करून देऊ, असं उद्धव ठाकरे वचननाम्यात म्हणाले.

याच बरोबर राज्यातील तरूण-तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहू आणि इंडिया आघाडीचे सरकार महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र स्थापन करणार असल्याचं देखील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननाम्यात म्हटले आहे.

वाचनाम्यातील महत्वाचे मुद्दे 
ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार
ग्रामीण भागातील युवकांना आणि युवतींना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ.

आरक्षण आणि सामाजिक न्याय
आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपा सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे. ओबीसी समाजही तणावग्रस्त आहे. महाराष्ट्रातील धनगर, कोळी तसेच भटके-विमुक्त्यांच्या मागण्याही प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून वाढविण्यासाठी आम्ही आग्रही राहू
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच आर्थिक व अन्य मांगास घटकातील विद्याथ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणारी मदत वाढविण्यासाठी आम्ही आग्रही राहू

आरोग्य रक्षण
महाराष्ट्रात कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने बजावलेल्या आरोग्य सेवांचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. सर्व नागरिकांना त्यांच्या आरोग्य रक्षणाचा मुलभूत अधिकार आहे हे मान्य करून सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची आहे. या सूत्रानुसार, सर्व जिल्ह्यामधील रुग्णालय आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करु. प्रथिमिक आरोग्य केंद्रामध्येही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ.

जी. एस. टी. सुधारणा
भाजपाशासित केंद्र सरकारने जी.एस.टी. प्रणालीची दडपशाहीने अंमलबजावणी करून कर दहशतवाद सुरू केला. यात देशातील राज्य सरकारे, स्थानीय स्वराज्य संस्था आणि छोटे व्यापारी यांना जबरदस्त त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास थांबविण्यासाठी अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत करून योग्य ती सुधारणा आम्ही करू.
सध्या 5, 12,18 व 28 टक्क्यांचे विविध टप्पे ‘एक देश, एक कर आणि एक दर या तत्वालाच हरताळ फासतात. त्यामुळे सर्व वस्तू व सेवांसाठी एकाच दराने कर वसुली करण्याची सुधारणा केली जाईल.
गेली 8 वर्षे जी. एस. टी. प्रणाली राबविताना केंद्र सरकार राज्यांना दुय्यम मानते व सर्व निर्णय केंद्राला अनुकूल घेतले जातात. यासाठी जी. एस. टी. यंत्रणेत बदल घडवून आणू आणि राज्याला केंद्राकडे हात पसरावे लागणार नाहीत याची व्यवस्था करू.

जी.एस.टी. लागू करताना महापालिका व नगरपालिकांचे उत्पन्न सुरक्षित ठेवले जाईल अशा स्वरूपाची आश्वासन देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कार्यवाहीत या स्थानीय स्वराज्य संस्थांना वाऱ्यावर सोडण्यात आले. नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविणे शक्य व्हावे म्हणून जी. एस. टी. च्या महसुलातून स्थानीय स्वराज्य संस्थांना योग्य त्या प्रमाणात हिस्सा देण्याची तरतूद करू.

सत्तेचे विकेंद्रीकरण
देशाची हुकूमशाहीकडे आणि एकाधिकारशाहीकडे चाललेली वाटचाल रोखून घटनेनुसार अंमलात आलेली संघराज्य पद्धती अधिक बळकट करू.

शेती आणि शेतकरी
शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, जंतूनाशक औषधे, खते, अवजारे इत्यादींवरील जी. एस. टी. पूर्णपणे काढून टाकला जाईल.
पीकविम्याचे जाचक ठरणारे निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल निकष बनविले जातील. अन्नदाता शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही, अशा रितीने शेतमालाच्या आयात-निर्यातीचे धोरण ठरविले जाईल. शेतमालाची नासाडी व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामांची व शीतगृहांची गरजेप्रमाणे उभारणी केली जाईल.

शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
शेतमालाला उचित हमीभाव देण्याचे धोरण शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून ठरविले जाईल. विकेल ते पिकेल या धरतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व योग्य सहकार्य मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करणार. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची उत्तम दर्जाची पुरवठा साखळी व्यवस्था निर्माण करणार.
शेती व शेतकरी हिताय पीक विमा योजनेचे पुनरार्वलोकन आणि सुधारणा करणार.

उद्योग आणि व्यवसाय
पर्यावरणाला घातक ठरणारे व विनाशकारी प्रकल्प म्हणून जनतेच्या मनात भीती निर्माण करणारे प्रकल्प नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळवून देऊ.
गिफ्ट सिटी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र स्थापन करणार.
उद्योग क्षेत्राच्या गतीमान प्रगतीसाठी तसेच पर्यटन व्यवसायात वाढ होण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुविधा विकसित करणार.
महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जाऊ नयेत यासाठी इतर राज्यांपेक्षा चांगल्या उद्योगस्नेही योजना आणि सुविधा देणार.

आदरातिथ्य (HOSPITLITY) क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देणार व त्याचा विकास करणार. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील.
महाराष्ट्रात उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी एक खिडकी योजना आणणार. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने नवीन शासकीय धोरण अस्तित्वात आणणार.

महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय स्थापनेस तात्काळ परवानगी देणारे धोरण आणणार. केंद्राच्या मदतीने सर्व राज्यात सर्व प्रकारचे उद्योग विकसित व्हावे यासाठी आग्रही राहणार. विनाशकारी प्रकल्प उदाहरणार्थ जैतापूर, बारसू, वाढवण यासारखे पर्यावरण आणि जनजीवनास घातक ठरणारे प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार करू आणि पुन्हा येऊ देणार नाही.

1 वर्षात 30 लाख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकर भरती करून तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार. केंद्र सरकारमधील सर्व नवीन नोकऱ्यांपैकी 50% महिलांसाठी राखीव ठेवणार. गरिबांसाठी शहरी रोजगार हमी योजना राबवणार.

सामाजिक सुरक्षा
विविध उपकर आणि अधिभार कमी करून किंवा रद्द करून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती कमी करणार. आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र सरकारचे अनुदान दुप्पट करून देणार

आर्थिक रचना
देशातील राज्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता जपली जाईल.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर
किमान 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील 5 वर्षे स्थिर ठेवण्यासाठी आग्रही राहू.

महिलांचा सन्मान
महिलांना संकटसमयी व अन्यायाप्रसंगी तात्काळ मदत मिळावी म्हणून शासनाच्या मदतीने ‘एआय चैट- बोट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना शासकीय मदत उपलब्ध करून देणार शासकीय यंत्रणा तसेच योजनेत महिलांचा योग्य सन्मान राखला जाईल व त्यांना पुरुषांएवढ्याच सुविधा व संधी उपलब्ध करून देणार.

इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने महिलांसाठी ‘महालक्ष्मी’ योजना जाहीर केली असून या योजनेप्रमाणे प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी 1 लाख रूपये देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. इंडिया आघाडी सरकारकडून या योजनेची त्वरीत व प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सदैव सतर्क राहतील. महिलांबद्दल जाहीरपणे अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

युवक विकासाचा कणा
महाराष्ट्रातील युवक-युवतींना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातच मिळवून देणार. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातील शिक्षण आधुनिक युगातील मागणीनुसार बदलणार संशोधन, कौशल्य, विकास यांना प्राधान्य दिले जाणार. युवक-युवतींचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार.

खेळ व खेळाडूंसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणार शासनाच्या सहकार्याने ‘सुरक्षित व आनंदी शाळा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.

शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि मानसिकता याकडे विशेष लक्ष देण्यासाठी आग्रही राहणार मधुमेह व इतर यांसारखे आजार असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जावे यासाठी योजना राबविणार. वैद्यकिय महाविद्यालयात चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात व हिंदुस्थानात खास करून महाराष्ट्रात उत्तम दर्जाचे प्रशिक्षित डॉक्टर निर्माण व्हावेत यासाठी केंद्र आराखडा तयार करणार.

काँग्रेसला पुन्हा धक्का, राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रा करणारा नेता भाजपमध्ये

सरकारच्या मदतीने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी उद्योगजगता विकास, संगणकीय भाषा (CODING), खगोल शास्त्रज्ञ, आर्थिक साक्षरता यासारख्या क्षेत्रात युवक सुशिक्षित व्हावेत यासाठी शिक्षण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार, केंद्र शासनामार्फत यासाठी विशेष आर्थिक सहाय्यता देणारी योजना आणणार

अभिजात मराठी
केंद्र व महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असूनही केवळ महाराट्र व भरतीवरच्या आकाराची माणसाची ही न्याय कमल इंजिन सरकार असूनही काळजाता था दशा मिळवून देण्यास सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वचनबद्ध आहे.

follow us