काँग्रेसला पुन्हा धक्का, राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रा करणारा नेता भाजपमध्ये

काँग्रेसला पुन्हा धक्का, राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रा करणारा नेता भाजपमध्ये

Sushrut Gowda Joined BJP : काँग्रेसकडून (Congress) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) जोरदार प्रचार सुरु आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि इतर मोठे नेते काँग्रेस उमेदवारांसाठी संपूर्ण देशात प्रचारसभा घेताना दिसत आहे. अशातच काँग्रेसला ऐन निवडणुकीत एक मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर आता पुन्हा एकदा मोठ्या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

माहितीनुसार,  म्हैसूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने काँग्रेसचे नेते डॉ. सुश्रुत गौडा (Sushrut Gowda) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक होते मात्र काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मोठा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

डॉ. सुश्रुत गौडा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये डॉ. सुश्रुत गौडा सहभागी झाले होते. ते राहुल गांधी यांच्यासोबत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालले होते. तसेच ते कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देखील होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

भाजपकडून निवडणुकीत गैरव्यवहार करण्याचा प्रत्यन, ‘आप’ने केला गंभीर आरोप

भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर डॉ. सुश्रुत गौडा म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र, अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ‘व्हिजन आणि मिशन’वर प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. तसेच माझे स्वप्न साकार करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी भाजप  हा सर्वोत्तम पक्ष आहे असे डॉ. सुश्रुत गौडा म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube