Download App

बाहेरून आलेल्या उमेदवाराला निर्यात करा, उद्धव ठाकरेंचा राम सातपुतेंवर निशाणा

Uddhav Thackeray Speech In Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो आणि जाहीर सभा घेत कॉग्रेससह शरद

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray Speech In Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुणेमध्ये महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी रोड शो आणि जाहीर सभा घेत कॉग्रेससह (Congress) शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली तर दुसरीकडे सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) प्रचारार्थ आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी या सभेत महायुतीच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करून प्रणिती शिंदेंना निवडून द्या असं आवाहन सोलापूरकरांना उद्धव ठाकरे यांनी केला.

नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, 2014 आणि 2019 मध्ये आम्हालाही मोदींबद्दल अभिमान होता, काय ती छाती, काय ती दाढी एक अकेला सबपे भारी, असं होतं पण आता एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, असं झालं आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपलं मानतो तो आमचा आहे मात्र तुम्हाला ही शिवसेना नको आहे तुम्हाला ही शिवसेना नकली वाटतेय. प्रज्वल रेवण्णा, देवे गौडा यांचा नातू त्यांचे हजारो सेक्स स्कँडल व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि मोदीजी सांगत आहेत, या प्रज्ज्वलला मत दिलं, तर माझे हात बळकट होतील. असे तुमचे कळकट हाताचे बळकट हात असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

इलेक्टोरल बाँड प्रकरणावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत इलेक्टोरल बाँड जगातील सर्वात मोठा घोटाळा असेल, असे निर्मला सीतारामन यांचे पती म्हणाले. तुम्ही त्यांच्याकडे ईडी पाठवणार का ? असा सवाल त्यांनी विचारला. जर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उघड केलं नसते तर आणखी कोट्यावधी रुपयांचे इलेक्टोरल बाँड छापले गेले असते असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुणे जिल्ह्यात NDA चौकार मारणार: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ग्वाही

तर महायुतीचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर टीका करत कांद्याची निर्यात बंदी असून या उमेदवाराला निर्यात करून टाका आणि त्यांचा डिपॉजिट जप्त करून प्रणिती शिंदे यांना निवडून द्या असं आवाहन सोलापूरकरांना उद्धव ठाकरे यांनी केला.

follow us

वेब स्टोरीज