Download App

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडणार, ‘या’ तारखेपासून होणार बुकिंग सुरू

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून सुमारे 202 गाड्या या वर्षी सोडण्यात येणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Railway Trains Ganesh festival : गणरायाची वाट पाहणार्या सर्व गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. (Railway Trains) यंदा चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 21 जुलैपासून या गाड्यासांकाठी बुकिंग करता येणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नीटचा निकाल पुन्हा जाहीर; एका क्लिकवर स्कोअर कार्ड करा डाउनलोड

गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या 1 सप्टेंबरपासून सुरू होतील. त्यासाठी उद्या म्हणजे, 21 जुलैपासून या गाड्यांच बुकिंग सुरू होईल अशी माहिती मुंबई मध्य रेल्वेचे CPRO स्वप्नील धनराज नीला यांनी दिली आहे.

 

 

 

follow us