ISIS Chhatrapati Sambhajinagar Connection : छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मुंबई विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केलं असून, येथी (ISIS)च्या दहशतवादी कटात लिबियन नागरिकासह दोन आरोपींची नावं आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. यासह संभाजीनगरमधील तब्बल 50 विद्यार्थी आयसीसच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (NIA)ने या वर्षाच्या सुरुवातीला (फेब्रुवारी 2024) अटक केलेल्या महाराष्ट्रातील (Chhatrapati Sambhajinagar) एम जोहेब खान आणि लिबियन एम. शोएब खान यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका मॉड्यूलशी (ISIS)च्या जागतिक नेटवर्कशी संबंधीत दहशतवादी कटातील प्रमुख सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या बातमीने मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपपत्रात काय नितीन गडकरींचा भाजपला घरचा आहेर; आमदार आयत करणं थांबवा, संघर्षातून कार्यकर्ते निर्माण करा
मोहमद जोएब लिबियातून जगभरात इसिसचं जाळं पसरवणारा मोहंमद शोएब खानने आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. जोएब त्याच्यासाठी स्लिपरसेल माणून काम करत होता. देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोप्ट्वच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार केली होती. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कियेत पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजीनगरातील जोएब त्या कटाचे मुख्य सूत्रधार होते, असं या दोषारोपपत्रात म्हटलं आहे.
कोण आहे मोहम्मद जोएब खान?
संभाजीनगरमधील मोहम्मद जोएब खान (40 वर्षे) छत्रपती संभाजीनगरमधील बेरीबाग परिसर राहत होता. बंगळुरूची वेब डेव्हलपरची गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून तरुण अभियंता दहशतवादाकडे वळला. त्याने इसिसचे ध्येय पूर्ण करण्याची शपथही घेतली. अर्धेअधिक कुटुंब इस्लामिक देशांमध्ये आहे. महिनाभरापासून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न करत आहे. मात्र, लिसांनी अर्ज प्रलंबित ठेवल्याने मोठी घटना टळली आहे.
हिंसाचार पसरवला अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत; जितेंद्र आव्हाड यांचा दादा नेत्यावर निशाणा
ISIS ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जातं. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. या सगळ्या संस्थांमध्ये हे दोघं काही प्रमाणात संलग्न असल्याचं समोर आलं आहे.