Uddhav Thackeray : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातली खासदार हा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा सध्या राज्यातील राजकारणात जोराने सुरु आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या खासदारासह आमदार देखील बंड करणार असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील एका बड्या नेत्याने केला आहे. शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ठाकरे गटातील 7 खासदार आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच 14 आमदार देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याचा दावा आमदार कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांनी केला आहे. या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
ऑपरेशन टायगरची चर्चा
पुढील काही दिवसात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडू शकते अशी चर्चा सध्या राज्यातील राजकारणात जोराने सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेत्यांची ठाकरे गटातील 7 खासदारांसोबत चर्चा पूर्ण झाली असल्याचा दावा देखील कृपाल तुमने यांनी केला आहे. यावर बोलताना तुमने म्हणाले की, ठाकरे यांच्या पक्षातील फूट येणाऱ्या सह ते सात दिवसांत होऊ शकते. आमची सात खासदारांसोबत अंतिम चर्चा झालेली आहे. ऑपरेशन टायगरअंतर्गत गेल्या बऱ्याच दिवसांपासून बैठका होत आहेत. आता चर्चा संपली आहे असं कृपाल तुमने म्हणाले.
कफ सिरपसह सर्व प्रकारची ‘सिरप’ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय
तर दुसरीकडे आमच्या पक्षातील सर्व खासदार आमच्यासोबत आहेत असं ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले. तर आम्हाला खासदार सोडून कुठेही जाणार नाहीत असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात भूकंप येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
