Download App

टीआरपी वाढवण्यासाठी आरोप, संजय राऊतांना गांभीर्याने घेऊ नका; जगतापांचा पलटवार

Sangram Jagtap On Sanjay Raut : अहिल्यानगर महानगर पालिकेत रस्त्यांच्या कामात साडेतीनशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना

  • Written By: Last Updated:

Sangram Jagtap On Sanjay Raut : अहिल्यानगर महानगर पालिकेत (Ahilyanagar Municipal Corporation) रस्त्यांच्या कामात साडेतीनशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर आता नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी खासदार राऊतांना प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार जगताप आज विधिमंडळ परिसरात लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलत होते.

लेट्सअप मराठीशी बोलताना आमदार जगताप म्हणाले की, माझ्यावर आरोप करताना खासदार राऊत यांनी ज्या वर्षांचा उल्लेख केला आहे त्या कालावधीत महापालिकेत शिवसेनेचा (Shivsena) महापौर होता. राज्य पातळीवर संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. महिलांसाठी ज्याप्रमाणे दररोज टीव्हीवर मनोरंजनासाठी मालिका असतात. त्या प्रमाणेचे पुरुषमंडळीसाठी संजय राऊत 2019 पासून मनोरंजनाचे साधन असल्याची टीका आमदार संग्राम जगताप यांनी लेट्सअप मराठी बोलताना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. तसेच अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातून खासदार संजय राऊत यांना माहिती पुरवणाऱ्यांना कोणी महत्व देत नाही अशी टीका देखील त्यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे (Kiran Kale) यांच्यावर नाव न घेता केली.

स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी आरोप

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, संजय राऊत वादग्रस्त विधानासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. संजय राऊत फक्त स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महायुतीमधील आमदारांवर आरोप करत असतात. राऊत स्वत : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते. जेलमधून बाहेर आल्यापासून त्यांना प्रत्येक व्यक्ती भ्रष्टाचारी दिसत आहे. त्यामुळे त्यांना आता फार कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांनी अहिल्यानगर महापालिकेत भष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे मात्र अहिल्यानगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शहरात किती विकास कामे होत आहे याबाबत माहिती आहे.

चेन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण, विराट कोहली जबाबदार, उच्च न्यायालयात अहवाल सादर

राऊत यांनी ज्या वर्षांचा उल्लेख केला आहे. त्या वर्षी महापालिकेत शिवसेना सत्तेत होती अशी टीका आमदार जगताप यांनी राऊतांवर केली. तसेच अहिल्यानगर शहराला बदनाम करण्याचा काम काही नगर शहरातील लोक करत असल्याची टीका देखील आमदार संग्राम जगताप यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केली. आरोप करणाऱ्या लोकांनी आरोप करत राहावे मात्र शहरात विकासाचे काम सुरु असणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार जगताप यांनी दिली.

follow us