Download App

मिमिक्री अन् व्यंगचित्रात समाधानी असाल तर शुभेच्छा…अजित पवारांचा राज ठाकरेंना चिमटा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना(Raj Thackeray) मिमिक्री करणं आणि व्यंगचित्र काढण्यात समाधान वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी(Ajit Pawar) राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी कालच्या सभेत अजित पवारांवर टीका केली होती. भर सभेत ठाकरेंनी पवारांची नकल केली होती. त्यानंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सत्तासंघर्षाच्या निकालावर निकम स्पष्टच बोलले, म्हणाले, न्यायाधीश निवृत्त होत असल्याने..

अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी पक्ष वाढवण्याऐवजी, अजित पवारांवर मिमिक्री करणं अन् व्यंगचित्र काढण्यात त्यांना समाधान वाटतं असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.

तसेच राज ठाकरे यांना नकला करण्याशिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणे राज ठाकरेंचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना लोकांनी कधीच नाकारलेलं आहे. पूर्वी त्यांचे १३ आमदार निवडून आले होते. पुढच्या वेळी एकच आमदार निवडून आला नसल्याचा टोलाही अजित पवारांनी त्यांना लगावला आहे.

Manipur Violence : शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतला ‘हा’ निर्णय

आमचे जुन्नरचे सहकारी असलेले शरद सोनवणे यांनी तिकिट घेतलं, म्हणून एक तरी पाटी लागली. आता कल्याणचेच एक सहकारी निवडून आले आहेत. बाकी, त्यांच्याबरोबर जे कोणी होते, काही जण सोडले तर सर्वच लोकं दूर गेले असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, कालच्या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नाट्यमय घडामोडींवर भाष्य करीत शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर आज अजित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

Tags

follow us