सत्तासंघर्षाच्या निकालावर निकम स्पष्टच बोलले, म्हणाले, न्यायाधीश निवृत्त होत असल्याने..
Ujjwal Nikam : राज्यातील सत्तासंघर्षावर (maharashtra Political Crisis) न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या निकालावरच राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. या सत्तासंघर्षाबाबत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
निकम यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी निकम म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल केव्हा लागेल हे जरी सांगता येत नसले तरी माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायाधीश घटनापीठातील निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. पुढील आठवडा राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरविणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य 15 आमदारांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. अॅड. निकम यांनीही तसेच मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही याबाबत विधान केले आहे. कोर्टाच्या सुट्ट्या सुरू होण्याआधी जर निकाल आला तर राज्यातील राजकारण बदलेल असे खडसे म्हणाले.
शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून दीर्घकालीन युक्तिवादानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे कारण, या निकालावरच राज्य सरकारचेही भवितव्य अवलंबून आहे. या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे आता सांगण्यात येत आहे.
राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देत युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठविण्याबाबत निर्णय राखून ठेवण्यात आल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले होते. त्यानंतर आता हा निकाल लवकरच येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संजय राऊत राष्ट्रवादीत ?; पवारांनी एकाच वाक्यात विषय संपवला म्हणाले, या पोरासोरांच्या..
न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने अॅड. कपिल सिब्बल आणि अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तसेच शिंदे गटाकडून अॅड. हरिश साळवे यांच्यानंतर अॅड. निरज किशन कौल आणि अॅड. महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.