Ajit Pawar Reaction On Nitesh Rane Statment : अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झालाय. यावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यावर आता अजित पवारांची (Ajit Pawar) प्रतिक्रिया समोर आलीय. मंत्री नितेश राणे यांनी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही घटना खरी आहे की 54 वर्षीय अभिनेता ‘फक्त अभिनय’ करत होता, असा सवाल केला.
सैफ अली खानवर घुसखोराने केलेल्या हल्ल्यानंतर पाच दिवसांनी मंगळवारी त्याला मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सैफ अली खानवर 16 डिसेंबर रोजी हल्ला (Attack On Saif Ali Khan) झाला होता, त्यानंतर 21 डिसेंबर रोजी दवाखान्यातून डिश्चार्ज देण्यात आला. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राणे म्हणाले की, सैफ अली खानला डिस्चार्ज दिल्यानंतर जेव्हा मी पाहिले, तेव्हा मला शंका आली. खरोखरच वार केला आहे की, फक्त अभिनय केलाय असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केलाय.
आगीची अफवा पळापळ अन् जीव वाचण्यासाठी उड्या; पुष्पकच्या अपघाताने मुंबईतील ‘तो’ अपघात चर्चेत
खान अडचणीत असतो तेव्हाच, चिंता व्यक्त करतात असा आरोप त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केला. दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे (एसपी) नेते जितेंद्र आव्हाड किंवा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे का बाहेर आले, असा सवाल देखील त्यांनी केला. राणे म्हणाले की, सुप्रिया सुळे यांना सैफ अली खान, शाहरुख खानचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची काळजी आहे.
VIDEO : ‘मी पाकिस्तानला चाललेय…तिथेच लग्न करणार’; राखी PM मोदींवर नाराज
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीय. अजित पवार म्हणाले की, मी तुमच्याशी बोलताना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलतोय. कालच नितेश राणे माझ्याकडे त्यांच्या खात्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. बाकी मला ते काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन. त्यांच्या मनात काय असेल, त्यांनी डिपार्टमेंटला सांगावं.
जळगाव दुर्घटनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, रेल्वेच्या रसोई भागाला आग लागल्याचं ऐकून भोगीत बसलेल्या प्रवाशांनी उड्या मारल्या. काहींनी स्वतःचा डोकं चालून साखळी ओढली. आतापर्यंत तेरा लोक मयत झाली आहे. 10 जणांचे पूर्ण मृतदेह मिळालेले आहेत. एक महिला आणि एक पुरुष शरीर अस्ताव्यस्त झाले आहेत. 10 जण जखमी झालेत.निव्वळ अफवांमुळे ही घटना घडली आहे. आता तिथली परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. रेल्वे त्या त्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत.