VIDEO : ‘मी पाकिस्तानला चाललेय…तिथेच लग्न करणार’; राखी PM मोदींवर नाराज
Rakhi Sawant Request PM Modi To Start Tik Tok Again : मनोरंजन विश्वाची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिने व्हिडिओमधून थेट यावेळी पंतप्रधान मोदींनाच (PM Modi) एक विनंती केलीय. राखीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात तिने म्हटलंय की, मी पाकिस्तानात जातेय, तेही लग्न करण्यासाठी जात आहे. अलीकडेच राखीने भारतातील ‘टिक टॉक’ (Tik Tok) बंदीबद्दल नाराजी व्यक्त केलीय. तिने पंतप्रधान मोदींना टिक टॉक पुन्हा सक्रिय करण्याचे आवाहन केलंय, असं झालं नाही तर पाकिस्तानात जाऊन तिथल्या कोणाशी तरी लग्न करून सेटल होईल, असंही राखीने म्हटलंय.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दिसतंय की, राखी सावंतने तिचा पासपोर्ट दाखवून पाकिस्तानला जात असल्याचं सांगितलंय. अलीकडेच राखीने भारतातील ‘टिक टॉक’ बंदीबाबत नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानात जाऊन लग्न करण्याची धमकी दिली होती, आता व्हिडिओमध्ये ती पासपोर्ट घेऊन पाकिस्तानात जाण्याबाबत बोलत असल्याचे पाहून नेटकरी भलतेच खूश झालेत.
मोठी बातमी! कपिल शर्मासह ‘या’ सेलिब्रिटींना पाकिस्तानातून धमकीचा मेल, ‘जर 8 तासांत…’
राखीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तिचा पासपोर्ट दाखवत म्हटलंय की, मी पाकिस्तानला जात आहे. राखीच्या या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणतेय, “मोदी जी, मी खूप नाराज आहे, मोदीजी ताबडतोब भारतात TikTok सुरू करा, संपूर्ण जग TikTok वर कमाई करत आहे, तुम्ही लवकर TikTok भारतात सुरू करा, नाहीतर मी पाकिस्तानात जाईन.
राखी सावंत पुढे म्हणाली, मी पाकिस्तानात स्थायिक होईल, बघा, मी विमानतळावर आहे, मी पाकिस्तानला जात आहे, मी तिथे एका पाकिस्तानीशी लग्न करून तिथेच स्थायिक होणार आहे. मी हलवा पुरी खाऊन पाकिस्तानात स्थायिक होणार आहे. मोदीजी, तुम्ही भारतात टिक टॉक ताबडतोब सुरू करा, अन्यथा मी पाकिस्तानात जाईन. राखी सावंतने मोदीजींना भारतात TikTok सुरू करण्याचे आवाहन केलंय.
खळबळजनक! घुसखोर बांगलादेशी महिला झाली ‘लाडकी’; मिळाला योजनेचा लाभ, 5 जण गजाआड
राखी सावंतच्या या व्हिडीओवर यूजर्सच्या मजेदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत, कुणी म्हटलं की तू आत्ता पाकिस्तानला जा, तर कुणी म्हटलं नाही, असं करू नकोस, राखीचे पाकिस्तानी फॅन्स कमेंट करत आहेत. ते राखीची वाट पाहत असल्याचं सांगत आहेत.