Download App

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु आहे, पण कुठलाही वाद नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला होता. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत, अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेलही दिल्लीत आहेत. तर राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर प्रफुल्ल पटेलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

बाप- लेकाची विकेट काढणारा अश्विन ठरला पहिला भारतीय, इंडिजमध्ये रचला इतिहास

पटेल म्हणाले, राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून अजित पवार यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेट झाली नव्हती. या भेटीसाठीच आम्ही दिल्लीत आलो आहोत. पटेल आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

Maharashtra Politics : ‘ते यारो का यार आहेत’; दिग्गज मराठी अभिनेत्याकडून राज ठाकरेंचे तोंड भरून कौतुक

तसेच भाजप-शिवसेनेकडे आधीची खाते आहेत, कुठले खाते काढून राष्ट्रवादीला द्यायचे आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायंच याबाबत चर्चा सुरु असून हसन मुश्रीफ त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. हा दिल्ली दौरा भाजप नेत्यांसोबत औपचारिक भेट म्हणून असणार आहे. तसेच १८ जुलैला होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत अजित पवार गट सहभागी होणार असल्याचेही पटेल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा काही केल्या सुटलेला नाही. महत्त्वाच्या खात्यांवर अजित पवार ठाम आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतच यावर आता तोडगा निघणार असल्याची चर्चा आहे.

Tags

follow us