Amol Mitkari : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि त्यांच्या कारच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये जो हल्ला करण्यासाठी एक मनसेचा प्रमुख कार्यकर्ता होता जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेवर अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. कुणाच्या चिथावणीनंतर जर सर्वसामान्य मुलाचा जीव जाणार असेल तर हे कसलं राजकारण असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. आपण मालोकर कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत, राज ठाकरेंनीही मुंबई सोडून मालोकर कुटुंबीयांच्या भेटीला यावं असंही मिटकरी यावेळी म्हणाले आहेत.
FIR मध्ये राज ठाकरेंचं नाव घेत मिटकरींची फिर्याद; गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचाही झाला मृत्यू
अमोल मिटकरी म्हणाले, 26 वर्षांचा एक युवक, कुणाच्या तरी चिथावणीनंतर या राड्यात गेला आणि नंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तोही त्याच्या पक्षाचं काम करत होता. पण अभ्यास करणारा तरूण जाणं याचं वाईट वाटतंय. मला काही झालं असतं, माझं कुटुंब उघड्यावर पडलं असतं तर यांनी काय केलं असतं? राजकारणाच्या या स्तरावर कुणीही जाऊ नये. ही घटना घडली याचं तीव्र दुःख आहे. मी सुद्धा त्याच्या परिवाराची भेट घेईन. जरी त्याने भावनेच्या भरात काही केलं असलं तरी कष्ठ करणाऱ्या घरातील एक मुलगा गेला आहे. माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की त्यांनी सोडून इथं यावं असही म्हणाले आहेत.
निसर्गाचा प्रकोप! वायनाडमध्ये भूस्खलन घटनेत मृतांचा आकडा 145 वर, पावसामुळे बचावकार्याला अडथळा
हे कुठलं राजकारण?
अमोल मिटकरी म्हणाले की,सर्वसामान्यांचा राजकारणात जर जीव जाणार असेल तर हे कुठलं राजकारण आहे? या घटनेला कुठलंही राजकारण आणणार नाही. मी जर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी चिथावणी दिली असती आणि त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला असता तर त्याच्या आई-वडिलांना काय उत्तर दिलं असतं. माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. मी राजकारणाच्या पलिकडे पाहतो. मालोकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सामील आहे. मात्र एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे.