Download App

मोठी बातमी! मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी; डावखरेंनी ‘कोकण’ राखले !

Legislative Councils Election 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अनिल परब

Legislative Councils Election 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) विजयी झाले आहे. त्यांच्या या निवडणुकीत तब्बल 25 हजार मतांनी विजय झाला असल्याचा वृत्त साम टीव्हीने दिला आहे.

अनिल परब यांच्या विजयची बातमी समोर येतात मुंबईमध्ये शिवसेनेकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्यांनी बाजी मारली आहे.

माहितीनुसार, कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना 58 हजारांचा लीड आहे. तर काँग्रेस उमेदवार रमेश किर यांना फक्त 18 हजार मते मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला तर भाजपला कोकण पदवीधरची जागा राखण्यात यश मिळाला आहे. मात्र याबाबत आतापर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही.

तर मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या मतदारसंघात सध्या टफ फाईट असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिवनाथ दराडे तर ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

26 जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली होती. तर आज 1 जुलै रोजी या चारही जागांवर मतमोजणी सुरु आहे.

… तर अन्सारी कुटुंबाचा जीव वाचला असता, ‘ती’ चूक पडली महाग; भुशीडॅम दुर्घटनेत मोठी अपडेट

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात निकाल निश्चित झाला असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे तर मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक विभागीय मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

‘टंकलेखन’ परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ, MPSC कडून परीक्षा रद्द

follow us

वेब स्टोरीज