Anna Hazare On Sonia Gandhi : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशातील भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर 2012 मध्ये आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सामन्य जनतेचा पाठिंबा मिळाला होता. तसेच तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले होते तर आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या आंदोलनावर मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या आंदोलनामागे भाजप (BJP) आणि आरएसएसचा (RSS) पाठिंबा होता असा दावा सोनिया गांधी यांनी आपल्या बिलॉगिन्ग : अ जर्नी ऑफ लव्ह (Blogging: A Journey of Love) या पुस्तकात केला आहे. तसेच आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींनी नंतर हे आंदोलन भाजप आणि संघाच्या पाठिंब्याने आयोजित करण्यात आल्याची कबुली दिली होती असा दावा देखील सोनिया गांधी यांनी या पुस्तकात केला आहे. सोनिया गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार, सरकारविरोधातील आंदोलनाचा राजकीय उद्देश सध्या झाल्यानंतर अण्णा हजारे आणि त्या आंदोलनाची चर्चा हळूहळू कमी झाली होती. या आंदोलनाच्या काळात आरएसएस पडद्यामागे नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पातळीवर पुढे आणण्याची तयारी करत होता असा दावा देखील सोनिया गांधी यांनी पुस्तकात केला आहे.
तर आता अण्णा हजारे यांनी सोनिया गांधी यांच्या या दाव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सोनिया गांधी यांचा नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचेच जग दिसते अण्णा अन्ना हजारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
माजी सरपंचाचा हॉटेलमध्ये राडा; मालकासह कामगारांना मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल…-
ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचेच जग दिसते. त्यांचा चष्माच त्या रंगाचा असेल तर त्यांना वेगळे काय दिसणार? कोण काय म्हणतो, यापेक्षा समाज काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे. मी कधीही कोणत्याही पक्षाच्या किंवा पार्टीच्या जवळ गेलो नाही, मी फक्त समाज आणि देश पाहिला. कोण निंदा करतो किंवा वंदन करतो, याकडे लक्ष न देता आपण आपले काम करत राहिले पाहिजे. कोण काय बोलते यापेक्षा समाज आपल्याकडे काय पाहतो, हेच महत्त्वाचे असल्याचे अण्णा हजारेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
