Download App

Avinash Sable: महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं करुन दाखवलं; अविनाश साबळेची स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत अविनाश साबळेची धडक. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : महाराष्ट्रातील बीडचा अविनाश साबळेने परिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेसध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत आहे. अविनाशने तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेत पहिलं स्थान कायम ठेवलं. त्यानंतर अविनाश साबळेनं 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरीत धडक दिली आहे. (Paris Olympics ) ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Video: बांगलादेशमध्ये हिसांचाराचं रौद्र रूप; आंदोलकांनी माजी कर्णधाराचं घर पेटवलं; व्हिडिओ व्हायरलं

अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका बाजूला ठेवून अविनाश साबळेनं सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. अविनाश साबळेनं सुरुवातीपासून आपला खेळ आवश्यक दिशेने केला आहे. तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी अविनाश साबळे पात्र ठरला आहे. अविनाश साबळेनं 8 मिनिट 15.40 सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

गेल्या वर्षभरापासून पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत आहे. अंतिम फेरीत पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे. देशाला माझ्यावर गौरव वाटेल, अशी कामगिरी करणार आहे, असं अविनाश साबळे म्हणाला. 7 ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एक पदक मिळालं होतं. आता थोडा आराम करुन पुढील फेरीत खेळणार आहे असंही अविनाश म्हणाला आहे.

Avinash Sable: बीड जिल्हातील शेतकऱ्याचा मुलगा; वाचा, पॅरिस ते ऑलिंपिकपर्यंतचा संघर्षमय प्रवास

नीरज चोप्रा त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल. त्याला पाहून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळेल. नीरज चोप्रा देखील भारताला पदक मिळवून देईल, असा विश्वास अविनाश साबळेनं यावेळी व्यक्त केला. 7 ऑगस्टला भारताला पुन्हा पदक मिळेल, असं अविनाश साबळे म्हणाला. अविनाश साबळे अंतिम फेरीच्या लढतीत खेळणार आहे. 7 ऑगस्ट रोजी अंतिम फेरी होणार आहे. सर्वांच लक्ष अंतिम फेरीकडे लागलं आहे.

follow us