Download App

मोठी बातमी! बच्चू कडूंनी दिला दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, काय आहे नेमकं कारण?

हार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. दिव्यांग मंत्रालयाबाबत (Ministry of Disability) सरकारचे उदासीन धोरण असल्याची टीका कडू यांनी केली.

करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलिस दलातील, साडी नेसून…; धस यांचा मोठा गौप्यस्फोट 

दिव्यांगांशी बेईमानी कदापि शक्य नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीतून आपण हा राजीनामा देत असून आपली सुरक्षा देखील काढून घेण्याची मागणी त्यांनी केली.

दिव्यांगाना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी आज आपला राजीनामा दिला. त्यांनी सीएम फडणवीसांना पत्र लिहिलं. यात कडू यांनी म्हटलं आहे की, भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार. मात्र मंत्रालयाकडून दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पदावर असताना हे काम होईल अशी शक्यता मला दिसत आहे. मी दिव्यागाशी अप्रामाणिक होऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या अपंग कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

जीवघेणा हल्ला, टाकीवर चढून आंदोलन… पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं फोडलं ‘सरपंचाचं’ बिंग 

बच्चू कडू यांनी आपल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करतांना म्हटलं आहे की, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दिव्यांगांना दिले जाणारे मानधन सर्वात कमी आहे. मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नसल्याकडे कडू यांनी लक्ष वेधलं. स्थानिक स्वराज्य संस्थां पाच टक्के निधीही खर्च करत नसल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं.

पदावर राहून आंदोलन करू शकत नाही…
आपल्या पत्रात ते पुढं म्हणतात, दिव्यांग मंत्रालय झुाले. मात्र, अजूनही स्वतंत्र मंत्री आणि सचिव या मंत्रालयासाठी नेमण्यात आलेला नाही. जिल्ह्याच्या ठिकणी स्वतंत्र कार्यालय सुध्दा नाही. पदभरती देखील करण्यात आलेली नाही. इतर अनेक गोष्टी झाल्या नसल्याचं कडू यांनी आपल्या पत्रात म्हटलं. त्यामुळे या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे. म्हणूनच दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलन करावी लागणार असल्यानं पदावर राहून आंदोलन करू शकत नाही. त्यामुळं पदाचा राजीनामा देत असल्याचं कडू यांनी स्पष्ट केलं.

 

follow us