करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलिस दलातील, साडी नेसून…; धस यांचा मोठा गौप्यस्फोट
करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्त होती.

Suresh Dhas : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा विषय सातत्याने लावून धरणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला. करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलिस दलातील आहे. त्या व्यक्तीचं नाव मला माहीत असल्याचं धस म्हणाले.
मध्येच श्वास थांबतो अन् झोप… वाल्मिक कराडला असणारा ‘स्लीप ऍप्निया’ नेमका काय?
सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान,करुणा शर्मा ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडून धस यांनी खळबळजनक दावा केला ते म्हणाले की, करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्त होती. साडी नेसून त्यानं करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवले होते. त्याच नाव देखील मला माहीत आहे. पण ते तुम्हाला सांगणार नाही. त्याचं नाव मी पोलिस अधीक्षकांना सांगेन, असे सुरेश धस म्हणाले.
पुढं धस म्हणाले की, वाल्मिक कराडने पोलिस दलातील काही लोकांच्या बदल्या केल्या आहेत. यातील काही अधिकारी आता त्याची चौकशी करत असल्याचा दावा धस यांनी केला. तपास पथकातील एकाला बदली करून कराड यांनी गडचिरोलीवरून आणलं आहे. त्या अधिकाऱ्यानं आता त्याची स्वामिनिष्ठा दाखवू नये, असं धस म्हणाले.
यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना धस म्हणाले, त्यांच्याच पक्षातील लोक म्हणत आहेत. मी अद्याप राजीनामा मागितलेला नाही. मात्र प्रकाश सोळंके हे जिल्ह्यातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की यांचा राजीनामा घ्या… कुणाला संधी देऊ नका. एखादं मंत्रीपद रिक्त राहू द्या. एक जागा रिक्त राहिली तर काही फरक फडतो का? असा सवाल त्यांनी केला.
बीडचे पालकमंत्री कोण असावेत?
पुढं ते म्हणाले की, बीडच्या पालकमंत्रिपदासाठी आमची पहिली पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार आमचा जिल्हा सुतासाऱखा सुरळ करतील. मी अजितदादासोबत काम केले आहे. त्यांना वेड्या गोष्टी आवडत नाहीत, असं धस म्हणाले.
ते म्हणाले की, मी उद्या परभणीच्या आणि परवा पुणेच्या मोर्चालाही जाणार आहे. 6 तारखेला राज्यपालांकडे चला असं सांगत आहेत, मी पण तिथे जात आहे. इथे पक्षाचा मुद्दा नाही. ही घटना भीषण आहे, असं धस म्हणाले.