मध्येच श्वास थांबतो अन् झोप… वाल्मिक कराडला असणारा ‘स्लीप ऍप्निया’ नेमका काय?
What is sleep apnea that Walmik Karad suffers : खंडणी केसमध्ये सीआयडी कोठडी असलेल्या वाल्मिक कराडनं (Walmik Karad) त्याच्यासोबत 24 तास एखादी खासगी व्यक्ती असावी, अशी न्यायालयाकडे मागणी केलीय. मला स्लीप ऍप्नियाचा त्रास आहे, असा दावा वाल्मिक कराडने न्यायालयाकडे केला. पण न्यायालयानं त्याची ही मागणी फेटाळून लावलीय. तुरुंगात असलेल्या व्यक्तीसोबत कोणताही खासगी व्यक्ती ठेवता (Beed News) येत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.
वाल्मिक कराडची न्यायालयाकडे नेमकी मागणी काय?
‘मला स्लीप ऍप्नियाचा त्रास असल्यामुळं एखाद्या खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा मिळावी. एखादा मदतनीस 24 तास सोबत देण्यात यावा. त्यासोबतच सीपॅप मशीनमिळावी,’ या मागण्या वाल्मिक कराडने केज जिल्हा सत्र न्यायालयाकडे केल्या (What is sleep apnea) होत्या. परंतु या सगळ्या मागण्या फेटाळत, शासकीय व्यक्तीकडून सुविधा मिळतील, असं न्यायालयाने सांगितलंय.
स्लीप ऍप्निया म्हणजे काय?
‘स्लीप ऍप्निया हा एक झोपेचा आजार आहे. यामध्ये व्यक्ती झोपेत असताना मानेचे स्नायू रिलॅक्स होतात, त्यामुळं वाढलेल्या वजनाचा फुफ्फुसावर दाब आला तर झोपेत असलेल्या व्यक्तीचं श्वसन काही सेकंदांसाठी बंद पडतं. त्या कालावधीत व्यक्तीला जाग येऊ शकते. त्याची झोप देखील डिस्टर्ब होऊ शकते. श्वसन व्यवस्थित झालं नाही, इतर अवयवांना रक्त पुरवठा झाला नाही, तर त्याचा परिणाम थेट हृदयावर होऊ शकतो,’ अशी माहिती डॉ. आनंद काळे यांनी दिलीय.
‘वामा-लढाई सन्मानाची’ चं चित्रीकरण पूर्ण; गौतमी पाटीलचं आयटम सॉंग लक्षवेधी
विष्णू चाटेच्या कबुलीनं कराडच्या अडचणी वाढल्या?
आवादा कंपनीकडून बीडच्या केज तालुक्यात पवनचक्की प्रकल्प आहे. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडने तब्बल 2 कोटी रूपयांची खंडणी मागितली, असा आरोप केला जातोय. याप्रकरणात कराडने सीआयडीसमोर आत्मसमर्पण देखील केलंय. तर दुसरीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) देखील, याच प्रकरणाशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणात विष्णू चाटे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. त्याने कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवरून संवाद साधला होता, अशी कबुली दिलीय. सीआयडीने हा अहवाल न्यायालयात सादर केलाय. त्यामुळं आता विष्णू चाटेच्या कबुलीनं कराडच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे.