Bachchu Kadu Reaction To Sachin Tendulkar Bodyguard : ऑनलाईन रमीच्या व्यसना मोठा फटका अनेकांना बसलेला आपण पाहिला आहे. यामधून कित्येक ठिकाणी आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत. नुकतीच अशी घटना समोर आली आहे. मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यामध्ये ऑनलाईन रमी गेमच्या नादाने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने त्याने ही आत्महत्या केली अशी माहिती समोल आली आहे. त्यावर आता आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.
मी आत्महत्या करणार नाही फायझर चा गैरकारभार उघड करणाऱ्या मेलिसाचं वक्तव्य
पुतळा जाळून आंदोलन करणार
ऑनलाइन गेममुळे सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली. हे निषेधार्थ आणि संताप आणणारं आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा असं थेट आव्हान कडू यांनी दिलं आहे. जर तेंडुलकर यांनी हे केलं नाही तर 6 जून शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 7 जून रोजी आपण सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार आहो असा इशाराही कडू यांनी यावेळी दिला आहे. याआधीही बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या विरोधात आंदोलन केलं होतं.
तेंडुलकरने ही जबाबदारी उचलली पाहीजे
तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाच्या आत्महत्येबाबत बच्चू कडू माध्यमांशी बोल होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. तसंच, कडू पुढे म्हणाले, अंगरक्षक सचिन तेंडुलकरांचा जीव वाचवण्याचं काम करत होता, त्याच अंगरक्षकाला सचिन करत असलेल्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला आहे. अंगरक्षकाला आत्महत्या करायची वेळ अली असेल तर सचिन तेंडुलकरने ही जबाबदारी उचलली पाहीजे असंही कडू म्हणाले आहेत. तसंच. भारतरत्न म्हणून आपण गौरविले, त्याच्या जाहिरातीमुळे अशी आत्महत्या करावी लागत असेल तर हे दुर्दैव आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शतकांचा विराट बादशाह; किंग कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वानखेडेवरच टाकले मागे
सुरक्षा जवानाची आत्महत्या
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) अंगरक्षक जवानाने 15 मे रोजी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. गेल्या 15 वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत असलेले प्रकाश कापडे (39) यांनी याआधी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक म्हणून काम केलं होतं. सध्या ते सचिन तेंडुलकरच्या मुंबई येथील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत अंगरक्षक म्हणून तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर येथील गणपतीनगर भागातील आपल्या निवासस्थानी परतले होते.