विराटचे शतक, सचिनची खास पोस्ट : विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर काय म्हणाला मास्टर ब्लास्टर?
कोलकाता : रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे कारकिर्दीतील 49वे शतक झळकावले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरोधात विराटने शतकी खेळी केली. त्याने 121 चेंडूत नाबाद 101 धावा फटकावल्या. सोबतच आज कोहलीचा वाढदिवसही आहे. त्याच दिवशी शतक झळकावत त्याने आपल्या चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. (Run machine Virat Kohli hits his 49th ODI century to equal Sachin Tendulkar’s record)
या शतकाने विराट कोहलीने क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. यातीलच एक रेकॉर्ड म्हणजे वनडे फॉर्मेटमधील 49 शतकं.
बर्थडे बॉय किंग कोहलीचे शानदार शतक! सचिन तेंडुलकरच्या वनडे शतकांशी बरोबरी
सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्ड मोडणे कोणाला शक्य होईल का? असा प्रश्न क्रिकेटप्रेंमींना पडत असे. पण आज त्याच्या या विक्रमाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. विराटने 119 चेंडूमध्ये शतक झळकावले. सचिन तेंडुलकरने 452 वनडे सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती, तर विराटने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतकं झळकावली आहेत. शिवाय या विश्वचषकातील त्याचे दुसरे शतक आहे.
हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी
दरम्यान, या खेळीनंतर आणि रेकॉर्डच्या बरोबरीनंतर सचिन तेंडुलकरने खास पोस्ट लिहित विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. “वेल प्लेड विराट, मला 49 वरुन 50 पर्यंत जाण्यासाठी यावर्षी 365 दिवस लागेल. पण, तू 49 पासून 50 पर्यंत लवकर जावेस आणि पुढच्या काही दिवसात माझा विक्रम मोडावास, यासाठी तुला खूप शुभेच्छा. अशा खास अंदाजात सचिनने विराटच्या खेळीचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छाही दिल्या.
Well played Virat.
It took me 365 days to go from 49 to 50 earlier this year. I hope you go from 49 to 50 and break my record in the next few days.
Congratulations!!#INDvSA pic.twitter.com/PVe4iXfGFk— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 5, 2023
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने वादळी खेळी करत शानदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मात्र एकापाठोपाठ टीम इंडियाला दोन धक्के बसले. पुढे किंग कोहलीनं मैदानावर पाय ठेवल्यानंतर मात्र टीम इंडियाचा डाव सावरला. विराटने मैदानावर आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. विराटने श्रेयस अय्यरच्या सहकार्याने धावांची शतकी खेळी केली. भारतीय संघाने 50 षटकांत 5 बाद 326 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले.