सार्वजनिक कार्यक्रमात यापूर्वीही नितीन गडकरींना अनेकदा आलीय भोवळ, जाणून घ्या नेमका त्रास काय ?
Nitin Gadkari Health Update : देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यामुळे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून जोरदार प्रचार पाहायला मिळाला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली.
तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील (Rajshree Patil) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. मात्र सभेमध्ये भाषणाची सुरुवात करताना त्यांना अचानक भोवळ आली. यामुळे एकच खळबळ उडाली. गडकरी यांना अचानक भोवळ आल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकाने आणि उपस्थितांनी त्यांना सावरलं अन् खुर्चीवर बसवलं. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली.
माहितीनुसार, मंत्री नितीन गडकरी यांना शुगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील धावपळ झाल्यामुळे त्यांना अचानक भोवळ आली. यापूर्वी देखील नितीन गडकरींना सार्वजनिक कार्यक्रमात चारवेळा भोवळ आली होती.
यापूर्वी गडकरींना कधी आली भोवळ?
नितीन गडकरी यांना 2018 डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा सार्वजनिक कार्य्रक्रमात भोवळ आली होती. त्यांना राहुली कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत सुरु असताना भोवळ आली होती.
यानंतर एप्रिल 2019 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नितीन गडकरी यांना भोवळ आली होती.
ऑगस्ट 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली होती.
तर पश्चिम बंगालमधील सिलिगुड येथील दागापूरमध्ये नोव्हेंबर 2022 आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांना भोवळ आली होती.