अमरावतीमध्ये शेतकऱ्यांसाठी अन् महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा, म्हणाले, आम्ही लोकांना लखपती बनवणार…

अमरावतीमध्ये शेतकऱ्यांसाठी अन् महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा, म्हणाले, आम्ही लोकांना लखपती बनवणार…

Rahul Gandhi: देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. आतापर्यंत देशातील 102 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यात अमरावतीसह (Amravati Lok Sabha Election) राज्यातील  काही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

आज काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतली.  या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार टीका करत शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहे.

या सभेत राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात तुमचं कर्ज माफ केले नाही. मात्र आम्ही सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज माफ करणार. याच बरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी आयोगाची (agricultural commission) स्थापना करणार. जेव्हा देशातील कोणत्याही राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल असं राहुल गांधी म्हणाले.

सत्ताधारी भाजपवर टीका करत राहुल गांधी म्हणाले, आज सरकार देशातील मोठं मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ करते मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. या देशात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, जर शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नसेल तर देशात कोणालाही कर्जमाफी करता कामा नये असे राहुल गांधी यांनी म्हटले. तर महिला मतदारांना आकर्षित कारण्यासाठी राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली.

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पक्षाचं सरकार सत्तेत आल्यावर महिलेच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षाला एक लाख रुपये जमा होणार. आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आम्ही  प्रत्येक गरीब कुटुंबाची आम्ही यादी बनवणार, या यादीतून  प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचं नाव निवडलं जाणार आणि  या महिलेच्या बँक खात्यात दर वर्षाला एक लाख रुपये जमा होणार.

अंगणवाडी सेविकांना दुप्पट मानधन मिळणार

या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यानंतर अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सना दुप्पट मानधन देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.  याच बरोबर महिलांना भारत सरकारच्या सार्वजिनक क्षेत्रात 50 टक्के आरक्षण देणार, असं देखील राहुल गांधी म्हणाले.

उमेदवार की मल्टिनॅशनल कंपनी, 5785 कोटींची मालमत्तासह ‘हे’ ठरले आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी म्हणाले, गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी 22-25 जणांसाठी खूप काही केले आहे. त्यांनी या लोकांसाठी नोटबंदी, जीएसटी केली. मोदींनी गेल्या 10 वर्षात या 22-25  लोकांना अब्जाधीश केलं, मात्र आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार, असं राहुल गांधी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube